digital products downloads

ठाणे जिल्ह्यातील पहिला कोस्टल रोड! मुंबई, नाशिकसह थेट गुजरातला जाण्यासाठी पर्यायी मार्ग; 33,64,00,00,000 रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

ठाणे जिल्ह्यातील पहिला कोस्टल रोड! मुंबई, नाशिकसह थेट गुजरातला जाण्यासाठी पर्यायी मार्ग; 33,64,00,00,000 रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Thane Coastal Road Project : मुंबई प्रमाणे ठाण्यातही कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील हा पहिला कोस्टल रोड आहे. यामुळे  घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून हजारो वाहन चालकांची सुटका होणार आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबई, नाशिक सह थेट गुजरातला जाण्यासाठी पर्यायी मार्ग मिळणार आहे.  33,64,00,00,000 रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 

Add Zee News as a Preferred Source

बाळकुंभ ते गायमुख दरम्यान 13.45 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी ठाणे कोस्टल रोडचे बांधकाम वेगाने सुरू आहे. 3,364 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे.  या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम आठ महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले होते. आठ महिन्यांतच प्राधिकरणाने कोस्टल रोडच्या पायाभूत कामाचे 50 टक्के काम पूर्ण केले आहे. पायाभूत कामानंतर, खांबांवर पिलर कॅप्स आणि आय गर्डर्स बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

देशातील पहिला ग्रीनफिल्ड रोड 

एमएमआरडीएच्या मते, ठाणे कोस्टल रोड हा देशातील पहिला ग्रीनफिल्ड कोस्टल रोड प्रकल्प आहे. या प्रकल्पात पहिल्यांदाच मोनोपाइल फाउंडेशन, सिंगल पाइल आणि सिंगल पिलर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पर्यावरण संवर्धन आणि खारफुटी क्षेत्रांचे संरक्षण करण्यास प्राधान्य देऊन, रस्त्याचा मोठा भाग
उड्डाणपूल म्हणून विकसित केला जाईल.

मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा

या कोस्टल रोडवरील एका मार्गिकेवर फक्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे. कोस्टल रोडमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. गर्दीच्या वेळी घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांब रांगा नेहमीच असतात. भिवंडी आणि कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणारे वाहनचालक बाळकुंभजवळ ट्रॅफिक जाममध्ये अडकतात. जर महामार्गावर वाहन बिघाड झाला किंवा अपघात झाला तर अनेक किलोमीटर लांब रांगा लागू शकतात. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर, नाशिक, भिवंडी, गुजरात आणि मुंबई उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग मिळेल. बाळकुंभ येथून कोस्टल रोडवर थेट प्रवेश शक्य होईल.

कोस्टल रोड महत्वांच्या मार्गांशी जोडणार

एमएमआरडीएने कोस्टल रोडला प्रस्तावित गायमुख-फाउंटन हॉटेल टनेल प्रकल्पाशी जोडण्याची योजना आखली आहे. एकदा हे प्रकल्प जोडले गेले की, वाधवान बंदर, जेएनपीटी, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना ठाण्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता कमी होईल. याव्यतिरिक्त, कोस्टल रोड ठाणे रिंग मेट्रो आणि साकेत-अमाणे एलिव्हेटेड कॉरिडॉरशी जोडण्याची योजना आहे.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp