
Free School Bags: महाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. सरकारकडून मोफत शालेय बॅग योजना सुरु करण्यात आलीय. ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ही योजना प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली. त्यात पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना मोफत बॅग पुरवण्यात येणार आहेत. काय आहे ही योजना? यासाठी किती खर्च करण्यात आलाय? कोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊया.
योजनेचा उद्देश काय?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. गरीब कुटुंबातील मुलांना शाळेच्या सुरुवातीला होणारा आर्थिक ताण कमी करणे आणि शिक्षणाची उपलब्धता वाढवणे हा यामागचा सरकारचा उद्देश आहे. ही योजना पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होईल. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शाळेतील उपस्थिती सुधारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
किती विद्यार्थ्यांना फायदा?
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या 41 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. पात्रता निकषांनुसार पहिली ते आठवी इयत्तेतील सर्व विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांपर्यंत ही योजना पोहोचवली जाईल. ज्या कुटुंबांना शाळेच्या वस्तू खरेदी करणे कठीण जाते, त्यांना मदत केली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने, योजना राज्यव्यापी स्तरावर राबवली जाईल. शिक्षण विभागाकडून याबाबतची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जाणार आहेत.
कशी होणार अंमलबजावणी?
योजनेची अंमलबजावणी जिल्हा आणि स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे. जेणेकरून बॅग वेळेवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. शाळेच्या सुरुवातीपूर्वी किंवा सुरुवातीला वितरण केले जाईल. खरेदी आणि वितरणाची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या देखरेखीखाली असेल. यामुळे व्यवस्था सुव्यवस्थित राहील आणि कोणताही विलंब होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतील.
किती येणार खर्च?
या योजनेसाठी सरकार 165 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे. हा बजेट बॅग खरेदी आणि वितरणासाठी वापरले जाणार आहे. बॅगांचे वितरण शाळांद्वारे असेल, ज्यात जिल्हा आणि स्थानिक स्तरावर संघटन केले जाणार आहे. बॅगेची गुणवत्ता आणि वैशिष्ट्यांबाबत तपशील अद्याप समोर आलेले नाहीत पण त्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार असतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



