digital products downloads

‘स्थायी’द्वारे सोशल इंजिनिअरिंग: भाजपकडून 5 नवीन चेहऱ्यांना संधी, सभापतिपदासाठी सानप, बोलकर, कुलकर्णी यांची नावे चर्चेत – Nashik News

‘स्थायी’द्वारे सोशल इंजिनिअरिंग:  भाजपकडून 5 नवीन चेहऱ्यांना संधी, सभापतिपदासाठी सानप, बोलकर, कुलकर्णी यांची नावे चर्चेत – Nashik News



भाजपने महापालिकेत स्थायी समितीवर सदस्य देतांना नऊ पैकी पाच जागांवर प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांना संधी देत धक्कातंत्राचा अवलंब केला. सोशल इंजिनिअरिंगची काळजी घेत सात महिलांना संधी दिली. तर राष्ट्रवादीला पाठिंबा देत गट नोंदणी केल्याने मुकेश शहाणे व शिवसेनेसोबत गट नोंदणी केल्याने मनसेच्या मयुरी पवार यांना स्थायीची लॉटरी लागली. शिवसेना उबाठाकडूनही दोघे स्थायीवर गेले. मात्र त्यांच्यासोबत जात गट नोंदणी करणाऱ्या काँग्रेसची झोळी मात्र खाली राहिली. स्थायी समिती सदस्य निवडीसाठी महापालिकेची विशेष महासभा सोमवारी (दि. १६) महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एक वर्षासाठीच सदस्यपदासाठी निवड सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर १६ चिठ्ठींतून ८ चिठ्ठी उचलून ज्यांची नावे निघतील त्या सदस्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्याजागी पक्षांकडून नवीन ८ सदस्य स्थायीवर पाठवले जातील. परंतु प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून उर्वरित ८ सदस्यही पक्षादेशानुसार राजीनामा देतात. तिदमे यांना नाराजीनाट्य भोवले, मात्र दिवेंना संधी शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी डावलल्याने प्रवीण तिदमे नाराज होते. त्यांना हे नाराजीनाट्य भोवले असून स्थायीच्या सदस्यपदासाठी त्यांचा विचार झाला नाही. याउलट ऐन निवडणुकीपूर्वी सेनेत प्रवेश केलेल्या व पक्षादेशाप्रमाणे उपमहापौरपद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे राहुल दिवे यांना स्थायीवर संधी दिली. तिदमेंसोबत पत्रकार परिषदेत हजर सुवर्णा मटाले, भागवत आरोटे व हर्षदा गायकर यांनाही संधी मिळू शकली नाही. सभापतिपदाकडे नजर भाजपकडे बहुमताचा आकडा असून स्थायीचा सभापती त्यांचाच होणार हे निश्चित आहे. त्यासाठी मच्छिन्द्र सानप, माधुरी बोलकर व दीपाली कुलकर्णी यांची नावे शर्यतीत आहे. मछिंद्र सानप यांनी पक्षादेशानुसार उपमहापौरपद निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते. दीपाली कुलकर्णी व माधुरी बोलकर याही शर्यतीत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp