digital products downloads

पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरा? म्हणाले, ‘विविध नेत्यांचे..’

पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरा? म्हणाले, ‘विविध नेत्यांचे..’

Naresh Arora Rajya Sabha Seat: अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी 30 जानेवारी रोजी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यसभेची जागा रिकामी होणार असून या जागेवर कोण जाणार अशी चर्चा असतानाच एक बातमी समोर आली अन् खळबळ उडाली. राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ पवारांचा विचार सुरु असल्याची चर्चा असतानाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी निवडणुकांसंदर्भातील नियोजन करणाऱ्या डिझाइनबॉक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नरेश अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीसाठी राजकीय जाहिरातबाजीचं कंत्राट मिळवलेल्या नरेश अरोरा यांना राज्यसभेचे वेध लागल्याच्या बातम्या समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं सकाळपासून दिसत होतं. यासंदर्भातील एक बातमी छापून आल्याने नरेश अरोरांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवलं जाणार का अशी चर्चा सुरु झाली. मात्र आता या वर नरेश अरोरांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

राज्यसभेची जागा हवी अशी चर्चा; नरेश अरोरांचं म्हणणं काय?

“नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून राज्यसभेची जागा हवी आहे, अशी जी चर्चा काही सोशल मीडियावरील ट्रोल्स आणि स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या मंडळींकडून रंगवली जात आहे, ती पूर्णपणे काल्पनिक आहे. वस्तुस्थितीशी तिचा दूरान्वयानेही संबंध नाही,” असं नरेश अरोरांच्या कार्यालयाने जारी केलेल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलं आहे. 

याआधीही आल्यात अनेक ऑफर्स पण…

“नरेश अरोरा यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध पक्षांसोबत व्यावसायिक नात्याने काम केले आहे. निवडणूक व्यवस्थापन, रणनीती आखणी आणि संघटनात्मक समन्वय या क्षेत्रात त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळेच या आधीही त्यांना राज्यसभेच्या उमेदवारीबाबत काही ऑफर मिळाल्या होत्या, हे खरे; पण त्यांनी प्रत्येक वेळी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की त्यांना स्वतः सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची अजिबात इच्छा नाही. विविध नेत्यांचे काम नम्रपणे आणि प्रामाणिकपणे करणे हे त्यांना अधिक समाधानकारक वाटते,” असंही नरेश अरोरा यांच्या कार्यलायाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ‘त्या’ भावनिक आवाहनानंतर NCP च्या बैठकीत एकच आवाज; ‘सुनेत्रावहिनी तुम्ही विनंती करू नका फक्त…’

कोणतीही पडताळणी न करता छापलेली बातमी

“ज्या तथाकथित वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली, त्यांनी किमान त्यांची बाजू जाणून घेण्याचे पत्रकारितेचे मूलभूत सौजन्य दाखवले नाही. प्रतिक्रिया न घेता, कोणतीही पडताळणी न करता छापलेली अशी बातमी हे पत्रकारितेच्या नीतीमत्तेला धरून नाही. त्यामुळे ही बातमी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशानेच प्रसिद्ध करण्यात आल्याचा संशय नाकारता येत नाही,” असंही नरेश अरोरांची बाजू मांडताना त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

हवेतून कथा निर्माण करण्याची कला असेल तर…

“पत्रकारिता ही जबाबदारीची भूमिका आहे. हवेतून कथा निर्माण करण्याची कला ज्यांच्याकडे आहे, त्यांनी कादंबरी किंवा चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावावे. सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींविषयी लिखाण करताना मात्र तथ्य, पडताळणी आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टींची जाणीव असणे आवश्यक आहे,” असं म्हणत बातमी छापणाऱ्या वृत्तपत्राला नरेश अरोरांच्या कार्यालयाने सुनावलं आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp