digital products downloads

महाराष्ट्रातील लाखोंची फी असलेल्या खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश, कधीपर्यंत करायचा अर्ज? A टू Z माहिती!

महाराष्ट्रातील लाखोंची फी असलेल्या खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश, कधीपर्यंत करायचा अर्ज? A टू Z माहिती!

RTE Admission: महाराष्ट्रातील खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित मुलांसाठी राखीव 25 टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत राज्यातील 8650 स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये एकूण 1 लाख 12 हजार 706 जागा या योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत. मुलांना इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश मिळू शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  

Add Zee News as a Preferred Source

 10 शाळांचा प्राधान्यक्रम

आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एका अर्जात जास्तीत जास्त 10 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. घरापासून 1 किलोमीटर अंतरातील शाळांना प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. अंतर तपासण्यासाठी गूगल मॅपचा वापर केला जाईल आणि पत्ता अचूक नमूद करणे आवश्यक आहे. 

कोण पात्र?

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित मुलं, दिव्यांग मुले आणि अनाथ मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील मुलेही पात्र आहेत. यापूर्वी आरटीईने प्रवेश घेतलेल्या मुलांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द मानले जातील, याची पालकांनी नोंद घ्या. 

अर्ज कसा करावा?

पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात ऑनलाइन सोडत (लॉटरी) काढली जाईल. त्यानंतर प्रवेशपात्र मुलांची यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर होईल. पालकांना प्रत्येक टप्प्यात एसएमएसने सूचना दिली जाईल. पहिल्या फेरीत जागा शिल्लक राहिल्यास प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी दिली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

कागदपत्रे

अर्जासोबत पालकांचे आधारकार्ड, मुलाचा जन्मदाखला, राहण्याचा पुरावा, लागू असल्यास जात प्रमाणपत्र, 2023-24 किंवा 2024-25 चा उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र आणि भाड्याच्या घरात राहत असल्यास नोंदणीकृत भाडे करार आवश्यक आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या समितीकडून कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

कधीपर्यंत करता येईल नोंदणी?

शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सुधारित नियमांनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. पालकांना 10 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. खोटी माहिती दिल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. मुदत संपल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp