digital products downloads

‘त्यांच्या घरातील CCTV काढा, अजितदादा किती वेळा…’; थेट BJP नेत्याचं नाव घेत रोहित पवारांचा गौप्यस्फोट

‘त्यांच्या घरातील CCTV काढा, अजितदादा किती वेळा…’; थेट BJP नेत्याचं नाव घेत रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Merger of 2 NCP  Ajit Pawar CCTV Footage: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनासंदर्भात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. रोहित पवारांनी यासंदर्भात उद्या म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन डिटेलमध्ये बोलणार असल्याचं जाहीर केलं. तसेच रोहित पवारांनी अजित पवार यांच्याशी झालेल्या विलीनीकरणाच्या चर्चेबद्दलचा पुरावा हवा असेल तर चक्क भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये पुरावा सापडेल असंही म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आमची चर्चा अजित पवारांसोबत झालेली

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या साप्ताहिक बैठकीमध्ये पक्षाच्या आमदारांना विलीनीकरणासंदर्भात जाहीर भाष्य करु नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात रोहित पवारांनी, “आमदारांना सांगितले गेले की विलनीकरणाबाबत बोलू नका. दादांसोबत आमची चर्चा काय झाली हे आम्हाला माहित आहे. आतली बाहेरची लढाई काय होती हे दादांनी माहित होतं,” असं म्हटलं. पुढे बोलताना, “विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपलाय. दादांबरोबर आमची चर्चा झाली होती. आम्ही एनडीएमध्ये  जायचे की दादा आमच्याबरोबर येऊन रस्त्यावरच लढाई लढणार होते या सगळ्या गोष्टी आमच्याशी  बोलल्या जात होत्या. आमच्याकडून पूर्णविराम लागला आहे,” असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं. 

नक्की वाचा >> ‘अजित पवार मागे फिरण्यास सुरुवात झालेली कारण अमित शाहांनी…’; राऊतांचा खळबळजनक दावा

या नेत्याच्या घरासमोरील सीसीटीव्हीमध्ये अजित पवारांचे फुटेज?

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये विलीनीकरणासंदर्भात अनेक बैठकी झाल्याचा दावा स्वत: जयंत पाटील यांनी केला आहे. आपण यासंदर्भात 11 वेळा अजित पवारांना भेटलो होतो असं जयंत पाटलांनी सांगितलं. याचाच संदर्भ रोहित पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिला. “दादा जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. लोढांचे घर समोर आहेत. सीसीटीव्ही काढा आणि बघा किती वेळा दादा भेटले,” असं रोहित पवार म्हणाले. म्हणजेच अजित पवार किती वेळा जयंत पाटलांच्या घरी आले गेले हे भाजपाचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या घरासमोरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं असेल असा दावा रोहित पवारांनी केला आहे. 

सुनेत्रा पवार अध्यक्षा झाल्याबद्दल काय म्हणाले?

सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड झाल्यासंदर्भात बोलताना रोहित पवारांनी, “मी काकींचं अभिनंदन करतो. ज्या लोकांनी काकींचे नाव एकमतांनी मंजूर केले त्या सगळ्यांचे अभिनंदन. काकींकडे ही जबाबदारी जावी असे सगळ्यांनाच वाटते,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. 

जयंत पाटील म्हणाले, सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या त्यावर सुद्धा चर्चा झाली

“माझी आणि दादा यांची 11 वेळ भेट झाली होती. सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या त्यावर सुद्धा चर्चा झाली होती. वेगवेगळ्या नेत्यांचे विधानं मी बघतोय. त्यावर मी काही बोलणार नाही,” असं जयंत पाटलांनी विलीनीकरणाच्या प्रश्नाला 14 तारखेला उत्तर देताना म्हटलं होतं. तसेच विलीनीकरण होणार का? या प्रश्नावर बोलताना जयंत पाटलांनी, “शशिकांत शिंदे, सुप्रिया ताई निर्णय घेण्यास सक्षम आहेत. आमचा पक्ष सुरू आहे. कामकाज सुरू आहे. आज विलीनीकरण यावर मला काही बोलावंसं वाटत नाही,” असं म्हटलं होतं.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp