
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : (Satara News) साताऱ्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा आजवर वेळोवेळी जगासमोर आला असून आता याच साताऱ्यात आणखी एक दुर्मिळ असा ऐतिहासिक ठेवा घरातील आवराआवर करताना समोर आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, या ठेव्यामुळं अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहेत.
कुठं सापडला हा वारसा आणि त्यात नेमकं आहे तरी काय?
साताऱ्यातील माहुली गावातील विनय कुंभारे यांच्या घरात साहित्याची आवराआवर करत असताना मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा तिथं सापडला. ही कागदपत्रे छत्रपती थोरले शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्यासह पेशवे यांच्या वतीने वेदशास्त्री कुंभारे शास्त्री यांना पाठविली असल्याचं कळत आहे.
ऐतिहासिक पत्रांमुळं माहुली गावाबाबत आणखी ऐतिहासिक माहिती समोर आली असल्याची माहिती त्यांचे वंशज विनय कुंभारे, डॉ. संदीप श्रोत्री, इतिहास संशोधक अॅड. सौरभ देशपांडे यांनी दिली. विनय कुंभारे यांना, ”घरात मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडल्यानंतर त्यातील पत्रांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे हस्ताक्षर आणि मुद्रा असणारी पत्रं, महाराणी ताराराणी, औंध पंतप्रतिनिधी, दुसरे बाजीराव पेशवे यांचे दस्तऐवज सापडले आहेत.
Mahuli Shahumaharaja Old Letters Found | माहुलीत सापडली थोरले शाहूमहाराजांची जुनी पत्रे!#mahuli #shahumaharaja #oldletters #zee24taas #marathinews #oldletters pic.twitter.com/TNtRUDKTFL
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 17, 2026
शाहू महाराजांचं हस्ताक्षर पत्राच्या शेवटी असून, शेवटी ”जाणिजे लेखनालंकार” असे त्यांच्या हस्ताक्षरात नमूद केले असल्याची माहिती विनय कुंभारे यांनी दिली.
थोरल्या शाहूंविषयी थोडं…
थोरले शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईं यांचे सुपुत्र, मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. 17 वर्षे मुघल कैदेत राहूनही, 1707 मध्ये मुक्त झाल्यावर त्यांनी ताराबाईंशी संघर्ष करून साताऱ्याच्या गादीवर वर्चस्व मिळवलं आणि पेशवे प्रथेच्या माध्यमातून मराठा सत्ता संपूर्ण हिंदुस्थानात रुजवली असं सांगण्यात येतं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



