
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी दावा केला की 2014 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की मी शपथविधीची तारीख ठरवावी. त्यावेळी काँग्रेसचे 58 आमदार माझ्या पाठीशी होते. सरमा यांनी पत्रकारांना सांगितले, ‘मी त्यांना (सोनिया) सांगितले होते की, जून 2014 मध्ये कामाख्या मंदिरात होणाऱ्या अंबुबाची मेळ्यानंतरच्या दिवशी शपथ घेईन. पण त्यावेळी अमेरिकेत असलेल्या राहुल गांधींनी पक्षाच्या नेत्यांना फोन केले आणि परिस्थिती बदलली.’ सरमा यांनी 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता आणि 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते. 2021 मध्ये ते आसामचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री म्हणाले- तेव्हा मुख्यमंत्री झालो असतो तर कदाचित प्रतिमा खराब झाली असती
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



