digital products downloads

अघोरी नृत्य प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा नाहीच: करमणूक म्हणून त्याकडे पहा, साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे आवाहन – Kolhapur News

अघोरी नृत्य प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा नाहीच:  करमणूक म्हणून त्याकडे पहा, साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे आवाहन – Kolhapur News



सातारा नगरपरिषदेने शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आघोरी नृत्य कार्यक्रम आयोजित केला असून तो कार्यक्रम अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धेला खत पाणी घातलेलं नाही. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत करण्यात आली. त्यावर साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांगितले की, आम्ही अंधश्रद्धेला कधीच खतपाणी घातले नाही आणि पुढेही घालणार नाही. या नृत्याकडे करमणूक म्हणून पहावे. कोणताही कार्यक्रम रद्द होणार नाही. या सर्वांमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सातारा नगरपरिषद आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यामुळे उद्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात साताऱ्यात अघोरी नृत्य हा कार्यक्रम होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सातारा नगरपरिषदेला शिवजयंती निमित्त अघोरी नृत्याचा प्रकार आयोजित करू नये, असे पत्र दिले होते. त्यानंतर त्या संदर्भात आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही भेटून त्यांच्याशी निवेदन देवून चर्चा केली आणि उपरोक्त मागणी केली. परंतु या मागणीवर बोलताना सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या नृत्य प्रकाराकडे करमणूक म्हणून पहावे. गोरगरीब कलावंतांचा तो रोजीरोटीचा प्रश्न आहे. या दृष्टिकोनातून त्याकडे पाहावे, असे आवाहन केले आहे. आणि मी अद्याप पर्यंत डॉ. हमिद दाभोलकरांशी या विषयावर चर्चा केलेली नाही. पण चर्चा करेन पण कार्यक्रम होणारच, असे त्यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp