
Rohit Pawar on Ajit Pawar Mobiles: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता अपघाताच्या कारणांसंबंधी वेगवेगळे दावे केले जात आहेत. रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अनेक शंका उपस्थित केल्या. ब्लॅक बॉक्सही आगीत जळून नुकसान झाल्याचं सांगितलं जात असताना रोहित पवारांनी फोटो दाखवत ब्लॅक बॉक्सच्या बाजूला भाग व्यवस्थित असताना हे शक्य कसं काय आहे? अशी विचारणा केली आहे. यादरम्यान त्यांनी अजित पवारांचे मोबाईल रिकव्हर होण्याच्या स्थितीत असताना ब्लॅक बॉक्स खराब कसा झाला? अशी शंकाही उपस्थित केली आहे.
अजित पवारांच्या मोबाईलमधील डेटाचं काय?
रोहित पवारांनी अजित पवारांकडे असणारे चारही मोबाईल रिकव्हर होण्याच्या स्थितीत असल्याचं सांगितलं आहे. तसंच त्यातील डेटाचं काय करायचं हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “तो त्यांचा व्यक्तिगत डेटा आणि माहिती आहे. माझ्या अनुषंगाने त्यांच्या परिवाराकडे ते फोन असावेत. त्या फोनमध्ये असणारा डेटा, माहिती, गोष्टींचं, महत्त्वाच्या कागदपत्रांचं काय करायचं हे त्याचा परिवार ठरवेल”.
फोनमधील माहिती रिकव्हर होण्याच्य स्थितीत ते चार फोन आहेत असं समजत आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच फोन टिकला, पण ब्लॅक बॉक्स खराब झाला हे थोडं संशयास्परद आणि हास्यास्पद आहे अशी शंकाही उपस्थित केली.
‘ब्लॅक बॉक्सजवळची बॉडी जळालेली नाही’
ब्लॅक बॉक्स 1100 डिग्री सेल्सिअसला तरच फटका बसू शकतो. त्यात वॉइस रेकॉर्डिंग, आणि एफडीआर असतो. ते 6 हजार मीटर खोलीपर्यंत 1 महिना पाण्यात टिकू शकतं. आपल्याला तिथे बरेचसे कागद न जळालेले दिसले. कारण आगीचा भपका काही वेळासाठी असतो. विमानाची बॉडी 635 डिग्रीला वितळते. ब्लॅक बॉक्सजवळची बॉडी जळालेली नाही. त्यामुळे छेडछाड झाली असं आमचं ठाम मत आहे. आमचं आज प्रेझेंटेशन होतं म्हणून उगाच काहीतरी माहिती दिली असावी असाही दावा त्यांनी केला.
‘विमान मुद्दामून आदळण्यात आलं’
“मुंबईवरुन हे विमान जात असताना इंधन भरलं होतं. हैदराबादला इंधन भरु शकला असता. महाराष्ट्रात इंधन स्वस्त मिळतं असा युक्तिवाद असेल तर सूरतमध्येही इंधन स्वस्त आहे. टाकीत आणि आतपण इंधन घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय होतं? मुद्दामूनच त्याचा वापर करुन हा घातपात झाला असावा. या घातपात असून इंधन जास्त असल्याने स्फोट होईल ही शंका खरी ठरताना दिसत आहे. त्यांनी अधिकृतपणे डीजीसीएला सांगितलं नव्हतं. एकतर उड्डाण करायला नको होतं. विमान मुद्दामून आदळण्यात आलं अशी आम्हाला शंका आहे,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



