
Tipu Sultan: मालेगावच्या उपमहापौर यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लागला यानंतर महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी याप्रकरणावर वादग्रस्त विधान केलं. यानंतर भाजपने राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने करुन निषेध नोंदवला. मालेगाव महानगर पालिकेच्या उपमहापौर यांच्या कार्यालयात लागलेल्या टिपू सुलतानच्या फोटोचा वाद आता राज्यभरात पोहोचलाय. यावर आता काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?
“छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे, त्यांनी स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने विचार नेला आहे, अगदी त्यांच्यांच मांदियाळीमध्ये, त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, अर्थात भूमीपुत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या प्रकरणावर सर्व स्तरावर टीकी झाल्यानंतर सकपाळ यांनी सर्वांची माफी मागितली आहे.
असिफ शेख यांच्याकडून पाठराखण
टिपू सुलतान आणि औरंगजेब हे विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांना विरोध का ? असा सवाल इस्लाम पार्टीचे असिफ शेख यांनी उपस्थित केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अभ्यास करूनच स्टेटमेंट दिले असेल तर हरकत काय असे म्हणत सपकाळ यांची असिफ शेख यांनी सकपाळ यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे. मालेगावात महापौर आणि उपमहापौर कार्यालयात काही नगरसेवकांनी टिपू सुलतानचा फोटो लावला होता. या फोटावरुन महाराष्ट्रात नव्हे तर देशात वाद सुरू आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे देखील स्टेटमेंट येत आहेत. जातीवादी शक्तींची देखील स्टेटमेंट येत आहेत. आंदोलन होत आहेत. टिपू सुलतानचा वाद कधीपासून सुरू आहे. तुम्ही संविधानाला मिटवू शकता का? भारतीय जनता पार्टी आणि जातीवादी संघटना आंदोलन करतात ते संविधानाला मिटवतील का? ब्रिटिश काळात टिपू सुलतान हे इंग्रजांच्या विरोधात लढले होते. हे मी सांगत नाही ते संविधानात आहे. संविधानात स्पष्ट लिहिले आहे असे आसिफ शेख म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी विधानावर व्यक्त होताना म्हटलं की, “त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानासारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कऱण्याचं जे काम त्यांनी केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. शिवरायांनी स्वराज्य तयार केलं. मोघलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केलं. सामान्य जनतेचं राज्य तयार करणारे शिवराय होते. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना करुन दोघांना सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुलचालन, जोडे चाटणे या जन्मात पाहिलेलं नाही”.
काय म्हणाले शाहू महाराज?
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं असेलट, असं विधान काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलं आहे. त्याचवेळी आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हे देखील पाहण्याची गरज आहे असं सुद्धा नमूद केलं. खरतर प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार आपण लक्षात घेतले पाहिजे, जनतेसाठी काय करावं लागेल हे त्यातून लक्षात येऊ शकतं असं देखील शाहू महाराज म्हणालेत. कोल्हापुरातील नर्सरी बागेत शिवछत्रपती यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्यानंतर शाहू महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



