
आज सगळीकडे शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. हा फक्त एक सण किंवा उत्सव नाही तर ही एक परंपरा आहे. परंपरा हजारो वर्षांपूर्वी महाराजांनी मिळवून दिलेल्या स्वराज्याची. कृतज्ञता आहे शिवरायांच्या कार्याची, एक जाणीव आहे आपल्या कर्तव्यांची. आज महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. असं असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या शिवजयंतीच्या मिरवणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अजित पवारांच्या आठवणीने आजही…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आजही अजित पवारांची आठवण काढल्याशिवाय लोकांचा एकही दिवस जात नाही. अशातच एका शिवजयंतीच्या ठिकाणी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अंगावर काटा उभा केल्याशिवाय राहणार नाही.
माझा आनंद हरपला…
नाशिकमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करण्यात आला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना डीजेवर माझा आनंद हरपला हे गाणे लावण्यात आले. या गाण्यातून अजित पवारांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जमलेला हजारोंचा समुदाय स्तब्ध झाला. एकाबाजूला शिवरायांचा पुतळा अन् समोर अजित पवार यांचा भलामोठा फोटो… अनेकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला.
सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीने भावुक
19 फेब्रुवारी 2026 रोजी किल्ले शिवनेरीवर पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्यात महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या पहिल्याच अधिकृत भाषणादरम्यान दिवंगत पती आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाल्या. प्रथमच शिवनेरीवर जाहीर भाषण: अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे हे शिवनेरीवरील पहिलेच जाहीर भाषण होते. या ऐतिहासिक भूमीवर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला.
अजितदादांच्या आठवणींना उजाळा
भाषणादरम्यान त्या म्हणाल्या की, “याच गडावर अजित पवारांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आणि स्वराज्याचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला”. दादांसाठी हा गड केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून प्रेरणेचा स्रोत होता, अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शपथविधीच्या कठीण प्रसंगाचा उल्लेख: त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ज्या कठीण परिस्थितीत घेतली, त्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की, जेव्हा समोर आव्हाने होती, तेव्हा त्यांच्या नजरेसमोर राजमाता जिजाऊ यांचे चित्र उभे राहिले, ज्यांच्याकडून त्यांना पुढे जाण्याची शक्ती मिळाली. वारसा पुढे नेण्याचा संकल्प: “दादांनी आयुष्यभर शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी सार्वजनिक सेवा केली. मी आज या पवित्र भूमीवर ग्वाही देते की, त्यांचा हा विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही,” असा दृढ संकल्प त्यांनी व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



