digital products downloads

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, साखरपुडा अन् …. धुळ्यात रक्तरंजित थरार! विचारही केला नसेल असा पाहुण्यात घडला प्रकार

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, साखरपुडा अन् …. धुळ्यात रक्तरंजित थरार! विचारही केला नसेल असा पाहुण्यात घडला प्रकार

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नाच्या हळदी समारंभाला रक्ताळलेले वळण मिळाले असून, दोन गटांतील वादातून झालेल्या भीषण हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला आहे.धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नाच्या हळदी समारंभाला रक्ताळलेले वळण मिळाले असून, दोन गटांतील वादातून झालेल्या भीषण हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला आहे. पिंपरळनेर (ता. साक्री) येथे एका विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम असल्याने वराकडील मंडळी आणि पाहुणे हास्यविनोदात मग्न होते. उद्यावर लग्न असताना संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच क्षुल्लक कारणावरून दोन गटात अचानक बाचाबाची सुरू झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या काही जणांनी धारदार चाकूने एकमेकांवर वार केले.

Add Zee News as a Preferred Source

या प्राणघातक हल्ल्यात दोघांचा पिंपळनेरमध्येच जागीच मृत्यू झाला. तर, एका गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी धुळ्यातील रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अवघ्या काही तासांवर लग्न आलेले असताना, मंगल कार्यालयात आनंदाऐवजी रक्ताचे पाट वाहिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आनंदाच्या गाण्यांऐवजी आता लग्नाच्या मंडपात आक्रोश आणि शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. एका आनंदी सोहळ्याचे रूपांतर अशा दुर्दैवी घटनेत झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 पिंपळनेरमधील नीळकंठ नगरात गोसावी समाजातील एका विवाह सोहळ्यानिमित्त साखरपुड्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. यावेळी साक्री आणि सोनगड (गुजरात) येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये जुन्या वादातून ठिणगी पडली. प्राथमिक माहितीनुसार, काही नातेवाईकांनी व्हॉट्सॲपवर एकमेकांना डिवचणारे ‘स्टेटस’ ठेवले होते. या डिजिटल वादाचा राग प्रत्यक्ष भेटीत अनावर झाला आणि त्याचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले. संतापलेल्या नातेवाईकांनी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर सपासप वार केले. या राड्यामध्ये एकूण 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आरोपींची नावे

याप्रकरणी पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवली असून यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभु गिरी गोसावी आणि हर्षु शंभु गोसावी यांच्यावर हल्ल्याचे आरोप आहेत. आनंदाच्या वातावरणात असलेल्या लग्नमंडपात अचानक रक्ताचे पाट वाहिल्याने परिसरात भीतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून जुन्या वादाचे नेमके स्वरूप काय होते, याचा शोध घेत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp