
Mumbai Pune Expressway : फेब्रुवारीच्या सुरुवातीला 3 तारखेला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना महावाहूतक कोंडीचा सामना करावा लागला होता. तब्बल 33 तास प्रवाशी वाहनांमध्ये तटकळत बसले होते. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा घाटाजवळ मिसिंग लींकच काम सुरु आहे, त्या कारणामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. आज गुरुवारी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीची सुट्टी असल्याने पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी सामना प्रवाशांना करावा लागला.
मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक मुंगीच्या पावलाने पुढे जाताना पाहिला मिळाली. विशेष म्हणजे पहाटेपासून ही वाहतूक कोंडी पाहिला मिळाली. खंडाळा बोगदाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहिला मिळाल्यात. लोणावळा आणि खंडाळा परिसरात मुंबई आणि पुणे दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहतुकीची कोंडी पाहिला मिळाली. यासंदर्भातील पोस्ट नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Again, stuck in a 90 minutes/ 1 hour 30 minutes jam on Mumbai Pune Express way. It has become a daily affair !#Mumbai #Pune #MumbaiPuneExpressway pic.twitter.com/govKwIvmwC
— Anil (@onlyanil123) February 19, 2026
अनेक किलोमीटरपर्यंच वाहनांच्या रांगा, उन्हाचा झळ, वेळेचा अपव्यय आणि इंधनाची नासाडी यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून खंडाळा-लोणावळा घाट मार्गाला पर्याय म्हणून उभारण्यात येत आहे. 13.3 किमी लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वरच्यावर वाहतूक कोंडी पाहिला मिळत आहे. तासन् तास एकाच जागी गाड्या उभ्या असल्याने वाहनधारकांना 3 फेब्रुवारीला झालेली महाकोंडीची आठवण झाली. त्यावेळी प्रवाशांचे अन्न-पाण्यावाचून भंयकर हाल झाले होते. पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होते की काय या भीतीने प्रवाशी संतापले होते.
Traffic stalled at Mumbai Pune express way standing still since past 30min.https://t.co/AsForITCkP@3rdEyeDude@Khurpenchinfra @IdiotsRoads @MTPHereToHelp @puneruralpolice pic.twitter.com/DsloEfgodB
— Cuckoo Chickoo (@Sunny_Again) February 19, 2026
भविष्यात मिसिंग लिंक प्रकल्पाने वाहतूक कोंडीतून सुटका!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आधुनिक रस्ता आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचा घाट रस्ता भविष्यात टाळता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा 25-30 मिनिटांचा प्रवास कमी होणार आहे. हा 6,695 कोटींचा प्रकल्प मे 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
@CMOMaharashtra, @DGPMaharashtra: This is Mumbai Pune Express way…completely jammed with trucks occupying multiple lanes, towards Pune, After Imagica/Khopoli…Very frustrating that admin is not taking any concrete steps despite same problems every public holiday @TOIIndiaNews,…
— Hanuman Tripathi (@ThinkerTrips) February 19, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
या मिसिंग लिंकमुळे 6 किमी अंतर कमी होणार आहे. यावर मार्गावर सर्वात रुंद दोन बोगदे असणार आहे. एक बोगदा हा 9 किमीपेक्षा जास्त लांबीचा असणार आहे. तसंच टायगर व्हॅलीवर 132 फूट उंचीचा भारताचा सर्वात उंच केबल-स्टेड पूल असणार आहे. हा संपूर्ण मार्ग 8 पदरी राहणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



