digital products downloads

लक्षणीय तापमानवाढीमुळं चिंतेत भर; ‘इथं’ प्रचंड उकाडा, कोकण की विदर्भ, सर्वाधिक होरपळ कुठे?

लक्षणीय तापमानवाढीमुळं चिंतेत भर; ‘इथं’ प्रचंड उकाडा, कोकण की विदर्भ, सर्वाधिक होरपळ कुठे?

Maharashtra Weather News : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह महाराष्ट्रावर आता फारसा परिणाम करताना दिसत नसल्यानं राज्यात आता उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात तापमानवाढ होणार असून, ही वाढ इतकी लक्षणीय असेल की होरपळ अधिक वाढणार असून, उन्हाचा तडाखा अधिक तीव्रतेनं जाणवणार आहे. प्रामुख्यानं राज्यात कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात पारा आतापासूनच 37 अंश सेल्सिअसवर पोहोचलाना दिसत असल्यानं ही तापमानवाढ आतापासूनच चिंतेत बर टाकताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईपासून कोकणापर्यंत फक्त घामाच्या झळा… 

पुढच्या 24 तासांसमवेत मुंबईत पुन्हा एकदा तापमानवाढीस सुरुवात झाली असून, पुढचे 3 दिवस हा ताप कायम असेल असा प्राथमिक अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवरील तापमानात पुन्हा तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, मुंबई आणि ठाण्यात पुढील 24 तासांपासून तापमानवाढीस सुरुवात होईल. तर, आठवड्याचा शेवट अर्थात शनिवार, रविवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. मुंबई शहरासह उपनगर, नवी मुंबई, पालघर, कल्याण-डोंबविली आणि अंबरनाथमध्येही पारा 35 अंशांहून अधिक असेल. 

उर्वरित राज्यात हवा कोरडी राहणार असून, किनारपट्टी भाग मात्र इथं अपवाद असे. कारण, या भागांमध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक असेल. फेब्रुवारी महिन्यातच पारा 35 अंशांपलिकडे गेल्यानं मार्च, एप्रिल, मे महिन्यात होरपळ आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मे महिन्याआधीच का वाढली उष्णता? 

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्यानं पुढच्या 48 तासांमध्ये तापमानात वाढ होणार अहे.  त्यातच समुद्राहून वाहणारे वारे मुंबईकडे दिरंगाईनं येत असल्यानं इथंही उकाडा अधिक जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती असून, धुळे, जळगावमध्ये पारा 36 अंशांपलिकडे जाण्याचा अंदाज आहे. सध्या वाढता उकाडा पाहता, या झळा असह्य होत असतानाच नागरिकांनी ऐन उन्हात, दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन यंत्रणा करत आहेत. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp