
Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिना अखेरच्या टप्प्यात असतानाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या हवामानाच लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये हवामानाची स्थिती बदलण्यास सुरुवात झाली असून, काही राज्यांमध्ये उकाडा सुरू झाला आहे. तर, महाराष्ट्रासह देशातील काही राज्य मात्र इथं अपवाद ठरताना दिसत आहेत. अर्थात या भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात उकाडा आणि अवकाळी एकत्रच!
राज्यात प्रामुख्यानं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई आणि नजीकच्या भागांमध्येसुद्धा पावसाची हजेरी असेल असं पूर्वानुमान आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनरांमध्ये पहाटेच्या वेळेसह दिवसासुद्धा दृश्यमानता धुक्यामुळं काही अंशी प्रभावित होताना दिसेल. तर, मुंबईचा पारा 34 ते 35 अंशांदरम्यान असेल. शहरात दमट हवामानामुळं उष्मा अधिक भासेल. कोकण किनारपट्टी, विदर्भातही ही स्थिती असेल असा प्राथमिक अंदाज यंत्रणेनं वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात सध्या उकाडा प्रचंड वाढत असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वातावरण कोरडं आणि उष्ण असेल. पुढच्या 24 तासांनंतर हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून, 22 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्रात होरपळ वाढत असून, नागरिकांना प्रचंड उष्णतेचा मारा सहन करावा लागणार आहे. ज्यामुळं नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही कामानिमित्त भर उन्हात घराबाहेर पडायचं झाल्यास योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
9 राज्यांमध्ये तूफान पावसाचा इशारा
फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशात सध्या बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यानं भक्कम स्थिती मिळवली असून, आयएमडीच्या पूर्वानुमानानुसार पुढचे 4 दिवस देशाच्या बहुतांश भागांमध्ये प्रचंड स्वरुपात वादळी पावसामुळं हवामानाचं चक्र बिघडेल असा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण भारतापासून याची सुरुवात होणार असून, हळुहळू हे वारे मध्य आणि पूर्व भारतावर प्रभाव पाडताना दिसतील.
वाऱ्यांच्या या रचनेमुळं दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळात तूफान पावसाचा अंदाज आगे. तर, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी असेल. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल. पर्वतीय भागांमध्येसुद्धा अचानक तापमानात घट आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे. तर, उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांवर मात्र या स्थितीचा फारसा प्रभाव पडणार नाही. आयएडीच्या माहितीनुसार येत्या 16 ते 18 तासांमध्ये जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तमिळनाडू, केरल, अंडमान-निकोबार द्वीप समूह, छत्तीसगढ़, ओडिशा आणि कर्नाटकात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



