digital products downloads

NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण?, समजून घ्या क्रोनोलॉजीवाईज इनसाइड स्टोरी

NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण?, समजून घ्या क्रोनोलॉजीवाईज इनसाइड स्टोरी

चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे: अजित पवार यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणान न भरुन येणारी पोकरी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंही यात आतोनात नुकसान झालंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास अजित पवार अनुकूल होते, अशी चर्चा सुरु झाली. पण नंतर हा दावा फेटाळण्यात आला. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणांच्या चर्चेला कशी गती मिळत होती? याची क्रोनोलॉजी वाईज इनसाइड स्टोरी समजून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

नोव्हेंबर 2024 मध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अजित पवारांचा फोन येतो, नागपुरात दोघांमध्ये एकञ येण्यासंबंधी प्राथमिक चर्चेला प्रारंभ होतो. सुप्रिया सुळे यांना चर्चेची माहिती दिली जाते. दोन्ही बाजूंकडून Go Ahead चा सिग्नल येतो.

12 डिसेंबर 2024 रोजी अजित पवार पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदा शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा द्यायला दिल्ली निवासस्थानी पुष्प गुच्छ घेऊन जातात. पण तिथे प्रफुल पटेल असल्याने फक्त सदिच्छा भेट होते.

पुढे 16 मे 2025 ला भवानीनगर साखर कारखाना इलेक्शन प्रचारसभेनंतर अजित पवार ताफा सोडतात आणि डॉ. अमोल कोल्हेंसोबत बारामती ते पुणे असा एकञ प्रवास करतात. त्यात बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यातील एकञिकरणावर चर्चा होते.

21 मे रोजी जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुप्रिया सुळे, अजितदादा, जयंत पाटील आणि कोल्हे यांच्यात पुन्हा एकञ बैठक झाली. सुप्रिया सुळे आणि अजित पवार पहिल्यांदा इथे एकञ येतात.

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनालाच विलिनीकरण करायचं का? इथपर्यंत ही चर्चा जाते. पण बिहार इलेक्शनमुळे भाजप पक्ष श्रेष्ठीकडून रेड सिग्नल मिळाल्याने सगळंच पुन्हा थांबते.पुण्यातच दोन्ही राष्ट्रवादीचे स्वतंत्र वर्धापन दिन साजरे होतात. पवार गटाचा वर्धापन दिन तर अगदी ऐनवेळी ठरतो. यातून ही एकञिकरणाची चर्चा कुठपर्यंत गेली होती हे स्पष्ट होते.

पुढे मग 5 ऑक्टोबर 2025 रोजी प्रवरानगरच्या प्रोग्रामला अजित पवार हे अमिक शहा यांच्याकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणाचा विषय काढतात. त्यावर दिल्लीत बोलू असं ठरतं.

त्यानुसार शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला अजित पवार पुन्हा दिल्लीला जातात आणि एकटेच अमित शाह यांना भेटतात. तिथूनच फडणवीस यांना राष्ट्रवादी विलिनीकरणाची कल्पना दिली जाते त्यावर ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ द्या असं सांगतात.  

14 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अमित शाह यांना भेटल्याचे ट्वीट पण अजित पवार 16 नोव्हेंबर रोजी आपल्या अकाउंट वरून करतात.

16 जानेवारी 2015 ला प्रेमकोर्ट येथे मुंबई अजित पवार यांच्या घरी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यात एकञित बैठक होते, त्यात तटकरे यांना विलीनीकरणाबाबत दोन्ही बहिण-भाऊ तटकरेंना पूर्व कल्पना देतात. हा दावा सुनिल तंटकरे यांना अमान्य असेल तर आमच्याकडे प्रेमकोर्ट येथील सीसीटीव्ही फुटेजदेखील असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते करतात.   

17 जानेवारी 2025 रोजी गोविंद बागेत कृषक प्रोग्राम च्या आधी पुन्हा अजित पवार यांच्यासोबत पवार गटाच्या नेत्यांची पुन्हा विलिनीकरणाची बैठक होते. या बैठकीचे तटकरे यांनाही निमंत्रण होते पण ते आले नाहीत.

याच दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्था पुणे जिल्ह्यात एकञित लढतात. नगरपरिषदेच पवार गट निष्क्रिय राहतो, पालिकेत एकञ  तर झेडपी थेट घड्याळावर लढले

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp