
देशातील ३७ आणि महाराष्ट्रातील ७ राज्यसभेच्या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उमेदवारीवरून मोठे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार पर
.
काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी गौप्यस्फोट केला होता की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याचे अजितदादांनी निश्चित केले होते. ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता संसदेत असणे गरजेचे आहे, असे दादांचे मत असल्याचे कोल्हेंनी म्हटले होते.
मात्र, आज रोहित पवार यांनी याला छेद दिला. ते म्हणाले, “विलीनीकरण हा अजितदादांसाठी राजकीय नव्हे तर भावनिक प्रश्न होता. विलीनीकरणानंतर अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा आणि शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार दादांच्या मनात पक्का होता. पक्ष विलीनीकरणासाठी शरद पवार यांनी कोणतीही अट ठेवली नव्हती, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले. रोहित पवारांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवारांची तिसरी पत्रकार परिषद
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी आज नवी दिल्लीत तिसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही तांत्रिक पुरावे सादर करत हा केवळ अपघात नसून ‘घातपात’ असल्याची दाट शंका व्यक्त केली. वैमानिकाचा जाणीवपूर्वक वापर करून हा अपघात घडवून आणला गेल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. “केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आणि संबंधित विमान कंपनीच्या मालकाचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होत नाही,” असा आरोप करत त्यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
विलीनीकरणाबाबत पवारांची भूमिका
२ एप्रिल रोजी काही सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्याने राज्यातील सात जागांसाठीची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या वर्तुळात शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांच्या दाव्यामुळे संभाव्य उमेदवारीबाबत नवा राजकीय रंग चढला आहे. एकूणच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय समीकरणे अजूनही अस्पष्ट असल्याचे चित्र असून, पुढील काही दिवसांत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…
अजितदादांना मोदी, शहाच न्याय देऊ शकतात:VSR कंपनीमागे खूप मोठे लोक; रोहित पवारांनी केली उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेदेपाचे व्हीएसआर विमान कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप करत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



