
Pune Crime: पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षांची एक छोटी मुलगी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. तिचा परिचित 29 वर्षीय ज्ञानेश्वर सुरेश रायरकर याने तिला “शाळेत सोडतो” असे सांगून आपल्या नवी विकत घेतलेल्या सेकंड हँड कारमध्ये बसवले. पण तो तिला शाळेत घेऊन न जाता करवे नगरातील दूधाने लॉन्सजवळील सुनसान जागी घेऊन गेला. तेथे कारमध्ये त्याने मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. काय घडला नेमका प्रकार? जाणून घेऊया.
कोण आहे आरोपी?
आरोपी ज्ञानेश्वर सुरेश रायरकर हा वारजे मालवाडी भागात राहणारा आहे. तो पेशाने ड्रायव्हर आहे. नुकतीच त्याने एक जुनी कार विकत घेतली होती. मुलीचा तो ओळखीचा होता म्हणून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कारमध्ये बसली. आरोपीने शाळेत सोडण्याच्या बहाण्याने तिला फसवले. घटना घडल्यानंतर त्याने मुलीला धमकी दिली की, “कोणालाही सांगू नकोस, नाहीतर वाईट होईल.” या घटनेनंतर मुलगी घाबरून गेली होती.
मुलीने कधी आणि कसे सांगितले?
मुलगी घरी आल्यानंतरही भीतीमुळे काही बोलली नाही. रात्री उशिरा ती आपल्या आईला सगळी घटना सांगून रडली. आईने ताबडतोब वारजे मालवाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि मुलीच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल केला. पोलीस तातडीने कारवाईला लागले. मुलीचे वय 13 वर्षे असल्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची गंभीर घटना मानली जात आहे.
पोलिसांनी कशी कारवाई केली?
वारजे मालवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक महेश बोलकोटगी यांनी सांगितले की, ‘आरोपी ड्रायव्हर असून त्याने नुकतीच कार घेतली होती. त्यांच्या पथकाने त्वरित माहिती घेतली आणि आरोपीला वारजे मालवाडी भागातून अटक केली. आरोपीची कारही जप्त करण्यात आली. पुरावे गोळा करण्यासाठी कारची तपासणी सुरू आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कायदेशीर कारवाई
आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अधिक तपास करत असून दुसरीकडे पीडित मुलीच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. पालकांना मुलींना एकटे सोडू नका, असे आवाहन पोलीस करत आहेत. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून लवकरच न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जातेय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



