
Pune Maharashtra Kesari Sikandar Shaikh : पुण्यात कुस्तीच्या आखाड्यात राडा झाल्याचं पाहायला मिळाले. ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यातील 11 लाखांच्या इनामी कुस्ती दरम्यान एका समर्थकाने थेट आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. मुळशीतील पौड येथे ही इनामी कुस्ती आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
या कुस्ती दरम्यान माऊली कोकाटेने आक्रमक होत सिकंदरच्या मानेवर प्रहार मारण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे सिकंदरचा संयम सुटला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद सुरू असतानाच, आखाड्याच्या कडेला असलेल्या माऊली काकाटेंच्या एका समर्थकाने अचानक मैदानात धाव घेतली. काही समजण्याच्या आतच त्याने थेट सिकंदर शेखवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून मैदानात गोंधळ उडाला
नेमक घडलं काय?
महाशिवरात्री उत्सवानिमित्त पौड येथे ‘मल्लिकार्जुन कुस्ती किताब’ स्पर्धेचे आयोजन 17 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेतील मुख्य आकर्षण होते सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे. आयोजकांनी ही कुस्ती ‘निकाली’च होणार असे जाहीर केल्याने दोन्ही पैलवान विजयासाठी जीव तोडून लढत होते. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत ही लढत तब्बल एक तास सुरू होती.
60 सेकंदांचा तो थरार आणि वाद
तासभराच्या झुंजीत दोन्ही पैलवान थकले होते, मात्र चुरस कायम होती. कुस्ती दरम्यान माऊली कोकाटेने आक्रमक होत सिकंदरच्या मानेवर प्रहार (थपडा) मारण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे सिकंदरचा संयम सुटला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद सुरू असतानाच, आखाड्याच्या कडेला असलेल्या माऊली जमदाडेच्या एका समर्थकाने अचानक मैदानात धाव घेतली. काही समजण्याच्या आतच त्याने थेट सिकंदर शेखवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून मैदानात गोंधळ उडाला आणि प्रेक्षकांमधून संताप व्यक्त होऊ लागला.
गुरूंची मध्यस्थी आणि वादावर पडदा
सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे कुस्ती वाद परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सिकंदरचे गुरू विशाल हारगुले यांनी तातडीने आखाड्यात उडी घेतली. त्यांनी दोन्ही पैलवानांना शांत केले आणि वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
शेवटी कुस्तीचा निकाल काय लागला?
भरपूर वेळ होऊनही आणि आखाड्यात झालेल्या राड्यामुळे कुस्ती निकाली होणे कठीण झाले होते. अखेर आयोजकांनी आणि पंचांनी वादावर पडदा टाकण्यासाठी मध्यममार्ग स्वीकारला. ही कुस्ती बरोबरीने (सोडवण्यात आली) घोषित करून दोन्ही पैलवानांना संयुक्त विजयी जाहीर करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



