digital products downloads

कात्रजमध्ये भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू: भारती विद्यापीठ पोलिसांकडून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

कात्रजमध्ये भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू:  भारती विद्यापीठ पोलिसांकडून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News



पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज भागात भरधाव डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिमा हेमंत प्रधान (वय ३८, रा. थ्री ज्वेलस सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अभिषक निगडे (वय ३५, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपर चालक संजय प्रभाकर जाधव (वय २८, रा. मानकर चौक, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे यांच्या नातेवाईक परिमा प्रधान पुणे-सातारा रस्त्यावरून जात होत्या. कात्रज चौकातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातानंतर डंपरचालक याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर दिवसा जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही डंपर, ट्रक आणि सिमेंट मिक्सरसारखी जड वाहने पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. भरधाव वेग आणि बेदरकारपणामुळे अशा गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे वाहतूक नियमांचे पालन न करण्याचे गंभीर परिणाम समोर येत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp