digital products downloads

कुर्ला BKC परिसरातील ट्रफिकमधून सुटका; अंधेरी आणि चेंबूरला जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण

कुर्ला BKC परिसरातील ट्रफिकमधून सुटका; अंधेरी आणि चेंबूरला जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण

 Mumbai Metro B2 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यामार्फत मुंबई मेट्रो लाईन २बी (डी. एन. नगर – मंडाले) अंतर्गत कुर्ला येथील हलाव पूलावर  दोन यू-गर्डरचे यशस्वी लाँचिंग पूर्ण करण्यात आले. या कामगिरी मुळे मुंबई अधिक वेगवान व परस्पर-संलग्न  घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.

Add Zee News as a Preferred Source

मेट्रो लाईन  2 बी हा महत्त्वाचा पूर्व–पश्चिम कॉरिडोर असून, डी. एन. नगर, बीकेसी, कुर्ला, चेंबूर आणि मंडाले या प्रमुख निवासी आणि व्यापारी केंद्रांना जोडणारा मार्ग आहे. या तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या कामाची यशस्वी पूर्तता ही दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी विश्वासार्ह व कार्यक्षम सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रगती दर्शविते.

हलाव पूल परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने मेट्रो व्हायाडक्ट आणि विद्यमान पूल यांच्यामधील उभ्या अंतराची मर्यादा केवळ 3.5 मीटर आहे. या तांत्रिक मर्यादांचा विचार करून संबंधित  यंत्रणांची आवश्यक मंजुरी प्राप्त केल्यानंतर काम अत्यंत अचूक नियोजनाद्वारे सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले.सार्वजनिक सोयीचा विचार करून ही उभारणी प्रक्रिया वाहतूकदृष्ट्या व्यस्त असलेल्या या परिसर असल्याने रात्रीच्या वेळी पार पाडण्यात आली. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी झाले, सुरक्षितता सुनिश्चित झाली व जड यंत्रसामग्रीचे कार्यक्षम नियोजन शक्य झाले. हलाव पूलावरून हलकी वाहने जसे की रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व रुग्णवाहिका यांची वाहतूक सुरू असून, जड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

हलाव पूलासमोरील एस. जी. बर्वे मार्ग मेट्रो स्थानक विमानवाहतूक उंची निकषांनुसार एकस्तरीय स्वरूपात नियोजित करण्यात आले आहे. स्थानकाच्या पायाभूत व पिअर कामांसह हलाव पूलाच्या दोन्ही बाजूंवरील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले असून, यामुळे समन्वयित व वेळेवर अंमलबजावणी झाल्याचे दिसून येते. प्रत्येकी 20 मीटर लांबीचे दोन यू-गर्डर (P610–P611 LHS) हे 500 मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली उभारण्यात आले. या टप्प्यानंतर प्रकल्प ट्रॅक बसविणे, ओव्हरहेड कॅटेनरी प्रणाली, वीजपुरवठा व्यवस्था व दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणी अशा पुढील कामांकडे प्रगती करीत आहे. तत्परतेने परिसर विकास उपक्रमही राबविण्यात येत आहेत. ए. एच. वाडिया रोडच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव बृहमुंबई महानगर पालिका यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असून, यामुळे वाहतूक सुलभ होण्यास तसेच गणेश विसर्जन व इतर गर्दीच्या कालावधीत वाहतुकीचे सुकर नियमन होण्यास मदत होईल. बाधित संरचनांचे पुनर्वसन नियोजित व न्याय्य पद्धतीने करण्यात येत असून, सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. हलाव पूलावरील यू-गर्डर उभारणी ही सूक्ष्म नियोजन, तांत्रिक कौशल्य व सार्वजनिक हिताचा समतोल राखण्याचे द्योतक आहे. प्रत्येक महत्त्वपूर्ण टप्प्यासह मेट्रो लाईन 2 बी ही मुंबईकरांसाठी विश्वासार्ह व कार्यक्षम वाहतूक व यास हातभार लावणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp