digital products downloads

ज्येष्ठ विधीज्ञ ज्ञानेश्वरराव बाबरेकर यांना मरणोत्तर सन्मान: मुंबईत ‘विधी महर्षी’ पुरस्कार प्रदान, कुटुंबीयांनी स्वीकारला – Amravati News

ज्येष्ठ विधीज्ञ ज्ञानेश्वरराव बाबरेकर यांना मरणोत्तर सन्मान:  मुंबईत ‘विधी महर्षी’ पुरस्कार प्रदान, कुटुंबीयांनी स्वीकारला – Amravati News



अमरावती येथील ज्येष्ठ विधीज्ञ ज्ञानेश्वरराव बाबरेकर यांना मरणोत्तर ‘विधी महर्षी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲड. बाबरेकर यांचे पुत्र माजी जिल्हा सत्र न्यायाधीश अशोक बाबरेकर, अधिवक्ता संजय बाबरेकर, प्रकाश बाबरेकर आणि कन्या कांचन थेटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार मुंबईत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रा’च्या उद्घाटन समारंभात वितरित करण्यात आला. कायदे क्षेत्रातील शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने हे केंद्र उभारण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर होते. तसेच, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता देविदास पांगम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सन्मानाबद्दल विधी क्षेत्रातील अनेकांनी बाबरेकर कुटुंबीयांचे अभिनंदन केले. ॲड. ज्ञानेश्वर बाबरेकर हे अमरावती जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ वकील होते. त्यांचा जन्म चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीशिवाय त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर वकिली क्षेत्रात मोठे नाव कमावले. त्यांनी आपल्या वकिलीची सुरुवात अचलपूर येथून केली. १९८२ ते १५ जून २००५ पर्यंत त्यांनी अमरावती येथे वकिली केली. दिवाणी, फौजदारी, सहकार, कामगार, महसूल आणि भाडेकरू अशा कायद्याच्या सर्व शाखांमध्ये त्यांचा दांडगा अभ्यास होता. १९६७ ते १९७२ या काळात त्यांनी अमरावती जिल्हा परिषदेच्या विधीज्ञ पॅनलचे सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच, १९६७ ते १९७२ दरम्यान नागपूर विद्यापीठाचे आणि १९८९ ते १९९४ दरम्यान अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. १९७४ ते १९७९ या काळात त्यांनी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष म्हणून आणि १९७० ते १९७९ दरम्यान अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp