digital products downloads

Red Soil च्या पूजा गवसला 6 महिन्यात दुसरा मोठा धक्का, नवऱ्यानंतर वडिलांनी जग सोडलं!

Red Soil च्या पूजा गवसला 6 महिन्यात दुसरा मोठा धक्का, नवऱ्यानंतर वडिलांनी जग सोडलं!

Red Soil Pooja Gawas: सोशल मीडियावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ‘रेड सॉइल स्टोरी’ या लोकप्रिय युट्यूब चॅनेलच्या पूजा गवसवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. केवळ सहा महिन्यांच्या आत तिला दोन मोठ्या आघातांना तोंड द्यावे लागलय. ऑगस्ट महिन्यात तिच्या पती शिरिष गवस यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. रेड सॉइलच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. याला 6 महिने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आता पूजाच्या वडिलांचेही कॅन्सरने निधन झाले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

दुसरा मोठा धक्का 

पूजाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून तिच्या वेदनेला वाट मोकळी करुन दिली आहे.शिरिष गवस हा रेड सॉइल स्टोरी चॅनेलचे मुख्य चेहरा होता. त्याच्या अचानक निधनाने पूजा आणि त्यांची छोटी मुलगी श्रीजा पूर्णपणे खचल्या होत्या. पूजाने काही दिवसात हळूहळू स्वत:ला सावरलं आणि चॅनेल पुन्हा सुरू केले. नवीन सुरुवात करत असतानाच दुसरा मोठा धक्का बसला.

11 वर्षांपासून कॅन्सरशी लढा

पूजाचे वडील गेल्या 11 वर्षांपासून कॅन्सरशी लढत होते. शिरिषच्या आजाराची बातमी कळल्यावर पूजेला सर्वात आधी त्यांच्या वडिलांची आठवण झाली. ते इतके वर्ष आजाराशी बिनतक्रार लढत होते, म्हणून पूजाला वाटले की शिरिषलाही काही होणार नाही. पण नशिबाने वेगळेच लिहिले होते. शिरिष गेल्यानंतर सहा महिन्यांनी वडिलांनीही हा जग सोडले.

काय म्हणाली पूजा?

पूजाने इन्स्टाग्रामवर लिहिले, “प्रिय पपा, अखेर तुम्हीही सोडून गेलात. आधी श्रीजाने बाबा गमावला, आता आजोबा. एका वादळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, तर दुसरे चक्रीवादळ आले.” “11 वर्ष तुम्ही कॅन्सरशी लढत होता, एक तक्रार न करता. तुमची ताकद माझ्यासाठी नेहमी प्रेरणा राहील’, असे ती पुढे म्हणाली.

रोज संध्याकाळी मी आणि श्रीजा तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचो. आता तो मार्गही बंद झाला.”“मम्मीने तुम्हाला जशी साथ दिली, तसाच खंबीरपणा मी घेईन. कधीही हार मानायची नाही, हे तुम्ही दोघांनी शिकवले. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत लढत राहायचे,” असे पूजाने लिहिले. 

“पपा, तुम्ही सुखात रहा. शिरिषला भेटलात तर सांगा, आम्ही चांगले आहोत. आम्हाला आशीर्वाद देत रहा.”, अशी भावनिक साद तिने वडिलांना घातली आहे. तिचे पूर्ण कुटुंब आता या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पूजा आपल्या चॅनेलद्वारे पुन्हा कामाला लागली असून प्रेक्षक या चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहेत. पूजाच्या या कठीण काळात सर्वांना त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp