digital products downloads

आता ‘बालभारती’ही बोलणार; शालेय अभ्यासक्रमात कसा होणार ‘एआय’ प्रयोग?

आता ‘बालभारती’ही बोलणार; शालेय अभ्यासक्रमात कसा होणार ‘एआय’ प्रयोग?

Academic Year 2026-27: शाळेच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसणारी बालभारतीची ताई आणि दादा विद्यार्थ्यांशी खऱ्या अर्थाने बोलू लागले तर? अशी कल्पना अनेकांना स्वप्नवत वाटते. पण आता हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून एक खास एआय सहाय्यक सुरू करण्याची तयारी शिक्षण विभाग करत आहे. या उपक्रमाबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना अभ्यासातील प्रश्न, संकल्पना आणि छोट्या शंका त्वरित समजावून सांगणारा हा डिजिटल मदतनीस असेल. त्यामुळे अभ्यास अधिक सोपा आणि संवादात्मक करण्याचा प्रयत्न होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की तंत्रज्ञान आता शहरापुरते मर्यादित राहिलेले नाही. ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळाही डिजिटल साधनांशी जोडल्या जात आहेत. विद्यार्थी मोबाइल, संगणक आणि इंटरनेटशी परिचित होत आहेत. त्यामुळे शिक्षणपद्धतीत बदल करणे आवश्यक बनले आहे.

विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला योग्य दिशा मिळावी यासाठी शाळांमध्ये नवीन प्रयोग केले जाणार आहेत. बालभारतीच्या मुखपृष्ठावरील बहीण-भावाचे पात्र एआय मॉडेलच्या रूपात विद्यार्थ्यांशी संवाद साधेल. हा प्रयोग अलेक्सा सारख्या व्हॉइस सहाय्यकाच्या धर्तीवर असणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार त्वरित मदत

या प्रणालीद्वारे विद्यार्थी धड्यातील एखादा मुद्दा समजला नाही तर लगेच प्रश्न विचारू शकतील. गणितातील उदाहरण, विज्ञानातील संकल्पना किंवा भाषेतील शब्दार्थ यावर ते त्वरित मार्गदर्शन देईल. शिक्षक नसताना देखील विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

याचे नाव काय असावे आणि मराठीसोबत इतर बोलीभाषांमध्ये संवाद शक्य आहे का यावर तज्ज्ञांची मते घेतली जाणार आहेत. काळानुसार सुधारणा करत ही प्रणाली अधिक उपयुक्त बनवली जाईल, असेही सांगण्यात आले.

शिक्षकांची भूमिका कायम

या तंत्रज्ञानामुळे शिक्षकांची गरज कमी होईल अशी भीती काहींनी व्यक्त केली. मात्र मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की एआय हा शिक्षकांचा पर्याय नसून सहाय्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा, मूल्ये आणि व्यक्तिमत्व विकास देण्याचे काम शिक्षकच करतात. एआय फक्त पूरक साधन म्हणून वापरले जाईल.

शिक्षकांनीही डिजिटल साधनांशी परिचित होऊन अध्यापन अधिक प्रभावी करावे, असे आवाहन करण्यात आले. भविष्यातील स्पर्धा ज्ञानाबरोबर तंत्रज्ञानाचीही असेल, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

हे ही वाचा: राज्यातील जागतिक वारसा किल्ल्यांसाठी जतन-संवर्धन, पर्यटन सुविधा आराखडे तयार; नेमकं काय होणार?

बालभारतीची पार्श्वभूमी

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, म्हणजेच बालभारती, 1967 पासून कार्यरत आहे. मोठी भावंडे लहानांना अभ्यास शिकवतात या संकल्पनेवर आधारित मुखपृष्ठ तयार करण्यात आले होते. निसर्गाच्या वातावरणात बहीण आपल्या लहान भावाला पुस्तक समजावत आहे, ही प्रतिमा अनेक पिढ्यांना परिचित आहे.

आता हीच प्रतिमा डिजिटल रूपात जिवंत होणार आहे. पुस्तकातील चित्रातून संवाद साधणारा एआय सहाय्यक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सोबती ठरणार आहे. शिक्षण अधिक रंजक करण्याच्या दिशेने राज्याचा हा एक महत्त्वाचा प्रयोग मानला जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp