digital products downloads

इफ्रामॅन मी की तू, मी की तू?: आदित्य ठाकरेंचा मुलुंड दुर्घटनेवरून मुख्यमंत्र्यांवर खोचक टोला; म्हणाले- महायुतीतच भांडणे सुरू – Mumbai News

इफ्रामॅन मी की तू, मी की तू?:  आदित्य ठाकरेंचा मुलुंड दुर्घटनेवरून मुख्यमंत्र्यांवर खोचक टोला; म्हणाले- महायुतीतच भांडणे सुरू – Mumbai News



आर्थिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट तसेच कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच विरोधकांनी चहापानवर देखील बहिष्कार टाकण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, सगळे काही गमती जमतीमध्ये चालले आहे. जसे इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी सांगितले, ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग, तुम्ही मला एक तरी असा जिल्हा दाखवा, जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे. आज आपण पाहिले तर शेतकरी आत्महत्येचा विषय आहे, गेल्या चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबदल्यात शेतकऱ्यांना एक तरी रुपया भेटला आहे का? पण सगळे काही रेटून न्यायचे, विधानसभेत खोटी आश्वासने द्यायची. इफ्रामॅन मी की तू, मी की तू? मुलुंड अपघातावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली. ते म्हणाले, हे सगळे एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहिले असेल, दोन ते तीन दिवसांपूर्वीचीच घटना आहे, मुलुंडमध्ये मेट्रोचे काम सुरू असताना पॅरापेट भिंतीचा काही भाग कोसळला, त्याच्याखाली एक रिक्षा चिरडली गेली, एका गाडीचा चुराडा झाला. या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. किंमत काय लावली त्याला? तर पाच लाख, म्हणजे आता ही आपल्या जीवाची किंमत झाली आहे. मला वाटते हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. जे स्वत:ला इफ्रामॅन इफ्रामॅन म्हणतात त्यांच्यामध्ये देखील भांडणे सुरू आहेत, इफ्रामॅन मी की तू, मी की तू? दोन वर्षात आम्ही की आता दोन वर्षात तुम्ही? अशी ही भांडणे सुरू आहेत. तसेच मला एक तरी उदाहरण दाखवा की यांनी जी पायाभूत सुविधांची कामे केली आहेत, ते त्यांनी एक तरी नीट केले आहे. कोस्टल रोडवर चला, तिथे त्यांनी म्युझिकल रोड केला त्याला विरोध नाहीच चांगलेच आहे. कोणाला अजून काही गंमत जमंत करायची असेल तर काही हरकत नाही, परंतु त्यावर खरोखर साडेसात कोटी खर्च करण्यासारखे काही केले आहे का? असा सवालही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एमएमआरडीवर देखील हल्लाबोल पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीवर देखील चांगलाच हल्लाबोल केला आहे. एमएमआरडीने एक जबरदस्त पूल तयार केला आहे, बॅटच्या आकाराचा, खरे तर ते जगातील 8 वे आश्चर्य वाटावे असा तो पूल आहे. आता असा पूल कोणी जर करत असेल तर तेवढा खर्च करण्याची त्याच्यावर गरज आहे का? त्याची पुढे काही चौकशी झाली आहे का? आणि हे सर्व होत असताना चालू कामामध्ये तुम्ही पाहात आहात दिल्लीमध्ये कोणी तरी उघड्या गटारात जाऊन पडले, आणखी एका ठिकाणी कोणी तरी कशात जाऊन पडले. इथे मुलुंडमध्ये वरतून काही तरी पडतेय. मग आयुष्य जगायचे तरी कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सरकार नो एन्ट्रीमध्ये गतीमान तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, पीक विम्याची तुम्हाला मदत मिळत नाही. शहरात नोकऱ्या मिळत नाहीत. बर जे नोकऱ्या शोधतायेत त्यांच्यावर इफ्रास्टक्चर मॅनच वजन पडतं आणि ते खाली चिरडले जात आहेत, राज्यात नेमके चाललेय तरी काय? हे सर्व या ठिकाणी सुरू आहे, ते म्हणतात गतीमान सरकार पण हे सरकार नो एन्ट्रीमध्ये गतीमान होत आहे, त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp