digital products downloads

Beed News: शिंदे सेनेच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचावले

Beed News: शिंदे सेनेच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचावले

Beed News: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे सेनेचे बीड उपतालुकाप्रमुख भारत देवकते यांनी म्हसोबा फाटा परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र साडी अचानक फाटल्याने ते खाली पडले आणि त्यांचा जीव वाचला. आसपासच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तसेच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून घटनेमागील कारणांबाबत विविध तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.

Add Zee News as a Preferred Source

व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवला अन्…

माहितीनुसार भारत देवकते यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो शेअर केला होता. “दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र” असा भावनिक संदेश त्यांनी लिहिला होता. त्या चिठ्ठीत त्यांनी ढेकणमोहा गावचे सरपंच पती शिवाजी भगवान गाडीवान आणि ग्रामसेवक बी.जी. तांदळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार गावातील गायगोठा, विहीर आणि शेततळे यांसारखी कामे कमी दरात किंवा नि:शुल्क करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र याला काही स्थानिक पातळीवरील विरोध होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सतत मानसिक ताण दिला जात असल्याने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी नमूद केले असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

कुटुंबीयांना जबाबदार धरू नका, अशी विनंती

देवकते यांनी आपल्या मित्रांना आणि शिवसैनिकांना लिहिलेल्या संदेशात पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणालाही जबाबदार धरू नये, अशी स्पष्ट विनंती केली आहे. तसेच जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना उद्देशून शेवटचा जय महाराष्ट्र असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा: ‘कपडे काढायला सांगून तासनतास पाहत रहायचा’; माजी महापौरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन सक्रिय झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. देवकते यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp