digital products downloads

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उन्हाळी पावसाळा… हवामानातील अजब बदल, आरोग्य सांभाळा

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उन्हाळी पावसाळा… हवामानातील अजब बदल, आरोग्य सांभाळा

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेपासून पश्चिमेपर्यंत हवामानात सातत्यानं मोठे बदल होताना दिसत असून या बदलांचा परिणाम महाराष्ट्रातही होताना दिसून येत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमधून थंडीनं केव्हाचाच काढता पाय घेतला असून, आतापासूनच प्रचंड उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मागील 48 तासांपासून राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असल्या कारणानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रविवारी सायंकाळी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळात पाऊस झाला. जिल्ह्यातील दाजीपुर अभयारण्य आणि फोंडा घाट परिसरात तर मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं होत. राज्यात सध्या एकीकडे प्रचंड उकाडा आणि दुसरीकडे अचानक पाऊस यामुळे नेमका कोणता ऋतू सुरू आहे हेच कळेनासं झाल्याचीच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पूर्व विदर्भात प्रामुख्यानं चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. तर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड इथंसुद्धा पावसाच्या तुरळक सरींचा इशारा देण्यात आला आहे. 

अचानक उन्हाळी पाऊस आला कुठून? 

गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्येस कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून, त्यामुळं दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, राज्यात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. 

कुठं येणार उष्णतेची लाट? 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पुढच्या 24 तासांमध्ये दमट हवामान पाहायला मिळेल. दुपारनंतर पारा 35 ते 37 अंशांदरम्यान राहील तर, किमान तापमानाचा आकडा 25 अंशांदरम्यान राहील. हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्मा अधिक भासणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पहाटेचा गारठा वगळता दिवसभर उष्णतेमुळं जीवाची काहिली होईल. किनारपट्टी भागांमध्ये तापमानाचा आकडा पाहता इथं उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती असेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp