
- Marathi News
- National
- Divorce; Increased By 50% In 20 Years, Women Take The Initiative In 58% Of Cases, Cases Increased 3 Times In 3 Years In Metro Cities
नवी दिल्ली56 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दिल्लीतील एक फॅमिली कोर्ट… सकाळचे दहा वाजलेले. बेंचवर एक महिला बसलेली. वय २८-२९ वर्षे, हातात फाइल, तिच्या डोळ्यांत ना पाणी ना भीती. शांततेत एक कठीण निर्णय. तीन वर्षांपूर्वीच तिचे लग्न थाटामाटात झाले होते. पण आज ती येथे आहे, एक असा निर्णय जो तिने एकटीने घेतला, तो तिला योग्यही वाटतो. ही काही एका व्यक्तीची गोष्ट नाही.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार भारतात दोन दशकांपूर्वी ०.६% विवाहित महिला घटस्फोटित किंवा विभक्त होत्या, आता हे प्रमाण १% झाले आहे. पुणे स्टडी १९८६-८७ नुसार, घटस्फोट ८४९ प्रकरणांपैकी ५७० (६७%) पतींनी दाखल केली होती, पण आता सुमारे ५८% महिला पुढाकार घेत आहेत.
कधी घेताहेत? लग्नानंतर ३ वर्षांत सर्वाधिक घटस्फोट
- मुंबई फॅमिली कोर्टाच्या एका अभ्यासानुसार, ४०% प्रकरणांत लग्नानंतर ३ वर्षांतच संबंध दुरावतात. घटस्फोट मागणाऱ्या महिला २५ ते ३४ वयोगटातील.
- अभ्यासानुसार, जानेवारी, सप्टेंबर व मे महिन्यात घटस्फोटाच्या जास्त याचिका येतात. तर, ऑक्टोबर-नोव्हेंबर, डिसेंबर व मार्चमध्ये सर्वात कमी.
- यामागे सण, मुलांच्या सुट्ट्या, न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या यांसारखी कारणे सांगितली जातात.न्यायालये अनिवार्य ६ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करत आहेत. ही प्रक्रिया वादग्रस्त घटस्फोटाच्या
- तुलनेत ३०% कमी तणावपूर्ण आणि जलद मानली गेली.
प्रमाण : महाराष्ट्रात जास्त, देशांमध्ये मालदीव अव्वल
राज्य घटस्फोट दर महाराष्ट्र 18.7% कर्नाटक 11.7% प. बंगाल 8.2% दिल्ली 7.7% तामिळनाडू 7.1% तेलंगण 6.7% राजस्थान 2.5%
कशासाठी? २३% घटनांत क्रौर्य व 14% मध्ये छळ
घटस्फोटाची कारणे प्रमाण खटले (२०२५ पर्यंत) वाटा परस्पर संमती 2.5-3 लाख 33.2% क्रौर्य 1.8-2 लाख 23.0% घरगुती हिंसाचार 1.2 लाख+ 14.5% सततची भांडणे 90 हजार-1 लाख 11.5% व्यभिचार 50-60 हजार 6.6% परित्यक्ता 40-50 हजार 5.4% लैंगिक समस्या 15-20 हजार 2.1% मानसिक आजार 10-15 हजार 1.5% विवाहपूर्वी धोका 8-12 हजार 1.2% धार्मिक मतभेद 5-10 हजार 0.9% एकूण 8.27 लाख 100%
कोण घेतेय? ३१ वर्षांच्या महिला, ३६ वर्षांचे पुरुष
घटस्फोटित महिला-पुरुषांचा कोणताही सरकारी राष्ट्रीय डेटा उपलब्ध नाही. मात्र, खासगी मार्केट रिसर्च कंपन्यांचा अभ्यास सांगतो- देशात घटस्फोटाचे सरासरी वय महिलांमध्ये ३१, तर पुरुषांत ३६ आहे. पीएलएफएस २०१७-२०२४ नुसार, शहरी भारतात पुरुषांमध्ये घटस्फोटितांचे प्रमाण ०.३% (२०१७-१८) वरून वाढून ०.५% (२०२३-२४) झाले आहे आणि महिलांमध्ये हे प्रमाण ०.६% वरून ०.७% झाले. घरगुती हिंसाचार, अनैतिक संबंध किंवा कौटुंबिक दबावासारखी घटस्फोटाची कारणे आहेत. सुशिक्षित महिला कायदेशीर अधिकार चांगल्या प्रकारे समजून घेत तो वापरण्यास कचरत नाहीत. देश घटस्फोट दर मालदीव 5.52% रशिया 3.9%% चीन 3.2% क्युबा 2.9% युक्रेन 2.88% अमेरिका 2.7% भारत 0.9% स्रोत : पीएलएफएस सर्व्हे (२०१७-२४), कायदा मंत्रालय, दिल्ली हायकोर्ट, लाइव्ह लॉ, एनसीआरबी, एनएफएचएस-५ (२०१९-२१), कौटुंबिक कोर्ट व जिल्हा न्यायालये. एडजुआ लीगल्स गुगल ॲनालिटिक्स २०२५ च्या अहवालानुसार, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, लखनऊ, हैदराबाद आणि कोलकात्यात घटस्फोटाची प्रकरणे गेल्या तीन वर्षांत ३ पटीने वाढली आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



