digital products downloads

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक: ‘क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार – Pune News

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:  ‘क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार – Pune News



पुणे शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. बांधकामांच्या साईटवरील धुळीमुळे होणारे प्रदूषण मोजण्यासाठी सेन्सर्स बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सेन्सर्सद्वारे मोजण्यात येणारे प्रदूषण कार्यालयात बसून पाहता यावे यासाठी ‘क्लिन एअर पोर्टल’ या डॅशबोर्डचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ५ हजार चौरस फुटांवरील बांधकाम साईट्सना सेन्सर्स बसवणे बंधनकारक आहे. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, लवकरच सर्वच बांधकामांच्या ठिकाणी सेन्सर्स बंधनकारक करण्यात येतील. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आणि पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे उपस्थित होत्या. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे सेन्सर्स बसवले जात आहेत. शहरात सध्या ५ हजार चौरस फुटांवरील सुमारे ३५० बांधकामे सुरू आहेत. यापैकी १६० बांधकामांच्या ठिकाणी सेन्सर्स बसवण्यात आले आहेत, तर उर्वरित ठिकाणीही ते लवकरच बसवण्यात येतील. शहरात एकूण १८ हजार ठिकाणी बांधकामे सुरू असून, या सर्व बांधकामांना लवकरच सेन्सर्स बंधनकारक करण्यात येणार आहेत. सेन्सर्सच्या माध्यमातून बांधकाम साईटवरील धुळीच्या प्रदूषणाची माहिती मिळाल्याने, प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत, हे विकसक, साईट इंजिनिअर आणि महापालिकेला समजण्यास मदत होईल. उपाययोजना न केल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. डॅशबोर्डमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक नोंदी उपलब्ध राहतील, अशी माहिती पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. प्रशासनाने मागील वर्षीही प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या दोनशेहून अधिक बांधकामांवर स्थगितीची कारवाई केली होती. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी सार्वजनिक ठिकाणचा राडारोडा उचलणे, आरएमसी प्लँटसाठी नियमावली तयार करणे, तसेच रस्ते तयार करताना वारंवार खोदाई टाळण्यासाठी पदपथ, पावसाळी लाईन्स आणि केबल डक्टसह रस्ते विकसित करणे अशा कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले. वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांवरील वाहतूक गतीमान करण्याचे प्रयत्नही करण्यात येणार आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp