digital products downloads

पहिल्या प्रज्ञाचक्षू महिला न्यायाधीशांचा सत्कार: दिव्यांग तरुणांना योग्य मार्गदर्शनासाठी दीपस्तंभ फाउंडेशनची गरज – आयुक्त बडे – Pune News

पहिल्या प्रज्ञाचक्षू महिला न्यायाधीशांचा सत्कार:  दिव्यांग तरुणांना योग्य मार्गदर्शनासाठी दीपस्तंभ फाउंडेशनची गरज – आयुक्त बडे – Pune News



देशातील पहिल्या प्रज्ञाचक्षू महिला न्यायाधीश तान्या नाथन सी यांचा दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे यांनी दिव्यांग तरुणांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी दीपस्तंभ फाउंडेशनसारख्या संस्थांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. बिबवेवाडी येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सभागृहात हा ‘यशोत्सव’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, ज्येष्ठ वकील एस. के. जैन, दीपस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन, प्रमुख अतिथी आर. के. लुंकड आणि डॉ. भाऊसाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तान्या नाथन सी यांच्यासह विविध स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रांत यश मिळवलेल्या अभिजीत गोसावी, तुषार चौगुले, यशवंत, विशाल शेलार आणि रोहित गायकवाड या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. आयुक्त बडे म्हणाले की, २०११ च्या जनगणनेनुसार देशात २ कोटी ७८ लाख दिव्यांग व्यक्ती आहेत. यापैकी केवळ २२ टक्के दिव्यांगांना सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून सेवा मिळतात, तर उर्वरित ७८ टक्के उपेक्षित राहतात. ही मोठी दरी कमी करण्यासाठी दीपस्तंभ फाउंडेशनसारख्या संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. दिव्यांग तरुणांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून ते इतरांना प्रेरणा देते, असेही त्यांनी नमूद केले. तान्या नाथन सी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, दिव्यांग असणे म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते, त्यामुळे त्यात कोणताही कमीपणा मानण्याची गरज नाही. शाळेपासून त्यांना चांगले मित्र आणि अनेक संधी मिळत गेल्या. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर एका ज्येष्ठ वकिलांनी त्यांना न्यायाधीश होण्याचा सल्ला दिला. तो सल्ला ऐकून त्यांनी तयारी केली आणि न्यायाधीश होण्यात यश मिळवले. कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य या दोन गोष्टी यशासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरतात, असे तान्या यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp