digital products downloads

हिंगोलीच्या ब्रम्हपूरी नदीघाटातून अवैध वाळू वाहतूक: ट्रॅक्टरसह 5.75 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाविरोधात गुन्हा दाखल – Hingoli News

हिंगोलीच्या ब्रम्हपूरी नदीघाटातून अवैध वाळू वाहतूक:  ट्रॅक्टरसह 5.75 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाविरोधात गुन्हा दाखल – Hingoli News


हिंगोली तालुक्यातील ब्रम्हपुरी शिवारातील नदीघाटातून पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले आहे. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ट्रॅक्टरसह 5.75 लाख रुपयांचा मुद्देमाल

.

हिंगोली जिल्हाभरात महसूल विभाग व पोलिस विभागाने वाळू घाटांवरून होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी युध्दपातळीवर मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनासाठी पथके स्थापन केली आहेत. या पथकाच्या माध्यमातून दररोज सकाळी व रात्रीच्या वेळी वाळू घाटांवर तपासणी केली जात आहे. या शिवाय वाहनांची तपासणी केली जात आहे. मागील आठ दिवसांत पोलिसांनी 10 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करून हि वाहने जप्त केली आहेत.

दरम्यान, हिंगोली तालुक्यातील ब्रम्हपुरी शिवारात नदीघाटातून वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर आल्याची माहिती नर्सी नामदेव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. के. दिघाडे, राठोड, जमादार खंडेराव नरोटे यांच्या पथकाने गुरुवारी ता. 26 रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी एक ट्रॅक्टर व त्यात वाळू भरलेले दिसून आले.

पोलिसांनी त्या ठिकाणी असलेल्या दत्ता इंगोले याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी ट्रॅक्टर व वाळू असा 5.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दत्ता इंगोले (रा. जवळा बुद्रूक ता. सेनगाव) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिघाडे पुढील तपास करीत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp