digital products downloads

संजीवनी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार: नॅशनल स्कॉलरशिप व इंटरमिजिएट‎परीक्षेत शाळेतील ३० विद्यार्थ्यांचे यश‎ – Ahilyanagar News

संजीवनी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार:  नॅशनल स्कॉलरशिप व इंटरमिजिएट‎परीक्षेत शाळेतील ३० विद्यार्थ्यांचे यश‎ – Ahilyanagar News



प्रतिनिधी | काक्रंबा येथील संजीवनी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी विविध क्रीडा स्पर्धा तसेच शैक्षणिक परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून शाळेच्या उज्ज्वल परंपरेला पुढे नेले आहे. विद्यार्थ्यांनी नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण होऊन तसेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेच्या गौरवात भर घातली आहे. नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिपमध्ये एकूण दहा विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून यामध्ये राजरत्न चंदनशिवे, प्रतीक म्हेत्रे, आर्या चंदनशिवे, रेशमा चंदनशिवे, कल्याणी न्नवरे, अजंली शिंदे, आयुष गायकवाड, अजंली करपे, आरोही कोरे, सुहास चंदनशिवे यांचा समावेश आहे. तर एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत २० विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेच्या परंपरेला सशक्तपणे पुढे नेले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागील मार्गदर्शन चित्रकला शिक्षक किरण वाघमारे आणि नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप विभाग प्रमुख पल्लवी ठोकरे यांचे आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार मुख्याध्यापक भोसले, ज्येष्ठ शिक्षक व्यंकट शिंदे व गोपाळ कुरनुरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी किरण वाघमारे, नितीन पवार, प्रसाद धर्माधिकारी, दयानंद शेरखाने, रामेश्वर राठोड, उमेश पांडागळे, अनिता गुरव, कळसे यासह इतर शिक्षक आणि उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp