
राज्यभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही होलिका दहनाचा सोहळा जल्लोषात पार पडला. घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढून आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अग्निदेवतेची पूजा करण्यात आली. या पवित्र अग्नीमध्ये निराशा, आळस आणि दरिद्र्याची आहुती देऊन सर्वांनी सुख, शांती आणि निरामय आरोग्यासाठी मंगल कामना केली. यंदा होलिका दहनाचा मुहूर्त सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 53 मिनिटांपर्यंतचा होता. होळी हा सण केवळ रंगांचा उत्सव नसून, तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दृष्टप्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा त्याग करून सात्त्विक विचार अंगी बाळगणे, हा या सणामागचा मुख्य उद्देश आहे. भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची पौराणिक कथा या उत्सवाशी प्रामुख्याने जोडलेली असून, त्यातूनच होलिका दहनाची परंपरा रूढ झाली. याव्यतिरिक्त, हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि नवीन कापणीच्या हंगामाचा आनंद साजरा करण्यासाठीही ओळखला जातो. प्रेम, एकता आणि निसर्गातील बदलांचे स्वागत करणारा हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला. फाल्गुन महिन्यातील प्रमुख उत्सव असलेल्या होलिकोत्सवाला उत्तर भारतात ‘दोलायात्रा’ किंवा ‘होरी’, तर दक्षिण भारतात ‘कामदहन’ या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात या सणाला ‘शिमगा’ किंवा ‘होळी’ म्हटले जाते, तर कोकण-गोमंतक पट्ट्यात ‘शिग्मा’ किंवा ‘शिग्मो’ हे नाव रूढ आहे. या नावांच्या उत्पत्तीबाबत ज्येष्ठ संशोधक श्री. रा. चि. ढेरे यांनी महत्त्वाचा संदर्भ दिला असून, त्यांच्या मते हेमचंद्राने ‘देशीनाममाले’त या सवाला ‘सुगिम्हअ’ (सुग्रीष्मक) असे संबोधले होते. या शब्दापासूनच पुढे कोकण भागात ‘शिग्मा’ आणि संपूर्ण महाराष्ट्रात ‘शिमगा’ हा शब्द प्रचलित झाला. राजकीय नेत्यांनी साजरा केला होलिका दहन उत्सव
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



