
- Marathi News
- National
- Vantara Became A ‘Sanjeevani’ For Wildlife; 50 Missions, Honored With Global Awards, Anant Ambani’s Footsteps Became An Ideal Of Conservation
जामनगर2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
जगातील मोठ्या वन्यजीव संरक्षण, पुनर्वसन आणि उपचार केंद्रांमध्ये समाविष्ट वनताराने आपल्या स्थापना दिनानिमित्त पहिल्या वर्षाची यशोगाथा मांडली. वनताराचे उद्घाटन एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. अनंत मुकेश अंबानी यांनी स्थापन केलेल्या ‘वनतारा’साठी हे वर्ष वन्यजीव बचाव, आधुनिक वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक संरक्षणाच्या क्षेत्रातील मोठ्या बदलांचे साक्षीदार ठरले. गेल्या वर्षभरात वनताराने वाघ, सिंह, सरपटणारे प्राणी, माकडे, पक्षी व इतर सस्तन प्राण्यांसह हजारो वाचवलेल्या प्राण्यांना आरोग्य मिळवून दिले. पशुवैद्यकीय पथकांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या. अनेक प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात परत पाठवले.
अनंत अंबानी यांना वन्यजीव देखभाल, संरक्षणातील जागतिक योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘ग्लोबल ह्युमन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. वनताराच्या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली आहे. प्राणिसंग्रहालयांच्या आंतरराष्ट्रीय संघटना ईएआरझेडए आणि एसईएझेडएचे सदस्यत्वही मिळाले. ‘ग्लोबल ह्युमन कन्झर्वेशन सर्टिफिकेशन’ , ‘प्राणिमित्र पुरस्कार २०२५’ देऊनही गौरवले आहे.
बचाव- सेवेची विशाल यंत्रणा
वनताराने वाईट स्थितीत जगणाऱ्या प्राण्यांची सुटका केली. ही संस्था २५० हत्तींची देखभाल करत आहे. सर्कस, सवारी, भीक मागण्याच्या कामांतून सुटका केली होती.
ऑटोमेटेड सिस्टिमद्वारे १.५६ लाख किलो पौष्टिक आहार
हजारो प्राण्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पूर्ण स्वयंपूर्ण प्रणाली आहे. याद्वारे रोज सुमारे १.५६ लाख किलो उच्च दर्जाचा पौष्टिक आहार बनवतात.५० तापमान-नियंत्रित वाहनांद्वारे हा आहार पोहोचवला जातो. या कामात २०० व्यावसायिक आणि १ हजारांहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.
सक्रिय रिस्पॉन्स टीम
वनताराची २०० सदस्यीय रिस्पॉन्स टीम २४ तास सज्ज असते. या टीमने ५० आंतरराष्ट्रीय बचावकार्ये, १५ वन्यजीव त्वरित प्रतिसाद मोहिमांत मदत केली. पंजाबमधील विनाशकारी महापुराच्या वेळी संस्थेने मानवी मदत आणि आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावली.
संशोधनासह आरोग्य केंद्रही, ७० हून अधिक तज्ज्ञ
वनताराची ‘राष्ट्रीय वन्यजीव रेफरल केंद्र (पश्चिम क्षेत्र)’ म्हणून निवड झालेली आहे. मुख्य लॅब व ११ सॅटेलाइट लॅब हा या संस्थेचा वैज्ञानिक कणा आहे. येथे ७० हून अधिक तज्ज्ञ रोज २ हजारांवर नमुन्यांची तपासणी करतात. येथे प्रगत सुविधा उपलब्ध आहेत.
संरक्षणासोबतच पुनर्वसन
संरक्षणाचा खरा अर्थ नामशेष प्रजातींना दुसरे जीवन देणेही आहे. याच उद्देशाने वनताराने गेल्या वर्षी गुजरातमध्ये ५३ ठिपके असलेले हरीण बरडा अभयारण्यात सोडले. तसेच इंडोनेशियामध्ये स्नेक-नेक्ड कासवांना त्यांच्या नैसर्गिक घरात पुन्हा वसण्यासाठी पुढाकार घेतला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



