
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात “हॉर्टिकल्चर डे’ अर्थात उद्यान विद्या दिवस कार्यक्रमाचा समारोप झाला. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून व्यावसायिक फायदेशीर शेती कृतीत आणावी, असे आवाहन परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ शेतकरी नेते उद्यान पंडित शेतकरी गोविंदराव जोशी यांनी याप्रसंगी केले. “शेतकरी जगला तरच देश जगेल’, या उक्तीप्रमाणे सध्या शेती -शेतकरी जगवणे काळाची गरज आहे. कृषी विद्यापीठ वर्षभर शेतकरी हिताच्या अनेक अनेक उपक्रमांची अंमलबजावणी आहे, असेही त्यांनी नमूद केले. शेतकरी बंधू-भगिनींनी सुमारे ५०० एकर प्रक्षेत्रावरील विविध फळबागा फुलशेतींचे प्रयोग देशी-विदेशी भाजीपाला लागवडीसह फळे फुले भाजीपाला प्रक्रियेचे विविध अंग जाणून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. समारोपप्रसंगी डाळींब पिकाचे राज्यातील तज्ञ डॉ. व्ही.एस. सुपे, औषधी व सुगंधी वनस्पती क्षेत्रातील तज्ञ डॉ. संजय वानखेडे, पॉलिहाऊस शेडनेट हाऊस आधी संरक्षित संसाधनांतून निर्यातक्षम फुल शेतीचा विकास करणारे डॉ. बी बी गडेकर, डॉ. देवानंद पंचभाई, संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाति तायडे, डॉ. शेषराव चव्हाण यांच्यासह विभाग प्रमुख फळशास्त्र विभाग डॉ. शशांक भराड, विभाग प्रमुख फुलशास्त्र विभाग प्रा. नितीन गुप्ता, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी केले तर अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी केले. आभार प्रा.डॉ. विजय काळे यांनी मानले. समारोपी सत्राचे अध्यक्ष तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी शेतकरी हितासाठी अकोला कृषी विद्यापीठाची कटिबद्धता अधोरेखित केली. विद्यापीठाने व्यावसायिक कृषी शिक्षण, काळसुसंगत संशोधन आणि नावीन्यपूर्ण विस्तार कार्यासह बीजोत्पादनात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र शेतकरी बांधवांचे अवलोकनासाठी निरंतर खुले करून दिले कुलगुरू डॉ. गडाख यांनी नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



