
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात इराणचे दिवंगत सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनी यांच्यासारखेच राज्य केले. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी जे खामेनींचे केले, तेच एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे केले, अशी बोचरी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी धुळवडीनिमित्त उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना केली आहे. यावेळी त्यांनी होळीच्या शुभेच्छाही दिल्या. गुणरत्न सदावर्ते यांनी आज आपले कुटुंबीय व समर्थकांसह धुळवड साजरी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने ‘बोंब’ मारत त्यांच्यावर निशाणा साधला. धुळवड हा सण आता वैश्विक झाला आहे. आनंदी आनंद असा या सणाचा अर्थ आहे. सर्वांचे मनोमिलन करणारा हा सण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या सणाचा आनंद द्विगुणीत झाला, असे ते म्हणाले. शरद पवार मुस्कान छुपाएं धुळवडीनिमित्त मी उद्धव व राज ठाकरे यांच्यावर हिंदीतून कविता केली आहे. त्यांना ती ऐकावीच लागेल असे नमूद करत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, होली आई रंगो वाली, बदल गई फिर चाल निराली. राज ठाकरे रंग बदलें, उद्धव संग मंच पे चढ लें. शरद पवार मुस्कान छुपाएं, पुरानी चाल फिर दोहराएं. एकनाथ शिंदें भी आए, कल की बातें भूल ही जाएं. बुरा न मानो होली हैं. खामेनींच्या मृत्यूमुळे इराणी महिला जाचातून सुटल्या
गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी खामेनींच्या मृत्यूमुळे इराणच्या महिला जाचातून सुटल्याचाही दावा केला. तसेच त्यांची तुलना उद्धव ठाकरे यांच्याशीही केली. इराममध्ये मुलींना त्रास होत होता. खामेनी हा हिजाब बंधनकारक करणारा नेता होता. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी ज्या पद्धतीने त्यांचा मृत्यू केला, त्यामुळे इराणच्या महिला जाचातून मुक्त झाल्या. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे हे खामेनींच्या विचारासारखेच राज्य करत होते. पण ज्या पद्धतीने इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी केले, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे राजकारण बूस्ट केले. हिसाब अभी बाकी हैं, बुरा ना मानो होली हैं, असे ते म्हणाले. हे युद्ध नव्हे तर मानवाधिकारांची लढाई गुणरत्न सदावर्ते यांनी इराणमधील युद्ध हे युद्ध नव्हे तर मानवाधिकारांची लढाई असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, इथे कोणताही हुकूमशहा चालणार नाही. हे युद्ध नाही ही मानवाधिकारांची लढाई आहे. महिलांच्या अन्यायावरची लढाई आहे. इराणमध्ये 13 वर्षांच्या चिमुकलीला लग्न करावे लागत होते. हे लज्जास्पद आहे. खामेनी काय कॅरेक्टर होते? त्यांच्याबद्दल कुणी सहानुभूती बाळगावी हा ज्याचा – त्याचा भाग आहे. पण महिलांच्या दृष्टिकोनातून या देशाला एक संस्कृती आहे. हुकूमशहा इराणमध्ये महिलांना त्रास देत होता. मानवाधिकार महत्त्वाचे आहे. खामेनी हा मानवतेच्या विरोधातील पुढारी होता. देश व सीमा मानू नका. धर्म माना असे तो सांगत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कोणतेही दुःख पाळण्याची गरज नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



