digital products downloads

प्रवाशाला धमकावून रोकड लुटणारे अटकेत: वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षाचालकासह तिघांना अटक, 10 हजार जप्त – Pune News

प्रवाशाला धमकावून रोकड लुटणारे अटकेत:  वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षाचालकासह तिघांना अटक, 10 हजार जप्त – Pune News



वाढदिवस साजरा करण्यासाठी बिहारमधील एका प्रवाशाला धमकावून दहा हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी रिक्षाचालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपींकडून रिक्षा आणि दहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गणेश अण्णा जगधने (वय २९), अमोल उत्तम गायकवाड (वय ३२) आणि अतुल रवींद्र गायकवाड (वय ३८, तिघे रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी आहेत. या प्रकरणी एका प्रवासी तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण मूळचा बिहारमधील जहाँगीरपूरचा असून, तो आपल्या मित्रासोबत पुणे स्टेशन परिसरातून जात होता. त्यावेळी आरोपी रिक्षाचालक जगधने आणि त्याच्या साथीदारांनी या दोघांना अडवले. त्यांनी तरुणाला धमकावून त्याच्या पत्नीकडून ऑनलाइन पद्धतीने दहा हजार रुपये मागवून घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपी रिक्षातून पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने आणि त्याच्या मित्राने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून जगधने आणि गायकवाड बंधूंना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी वाढदिवस साजरा करण्यासाठीच प्रवाशाला धमकावून खंडणी उकळल्याचे कबूल केले. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp