digital products downloads

साताऱ्यात कोयता गँगची धिंड: करंजे नाक्यावरील हल्लेखोरांना पोलिसांनी घटनास्थळी फिरवले – Kolhapur News

साताऱ्यात कोयता गँगची धिंड:  करंजे नाक्यावरील हल्लेखोरांना पोलिसांनी घटनास्थळी फिरवले – Kolhapur News



सातारा शहरातील करंजे येथील गॅरेज चालकावर कोयत्‍याने प्राणघात हल्‍ला करणार्‍यांना बुधवारी पोलिसांनी घटनास्‍थळ दाखवण्यासाठी तेथे फिरवले. हल्‍लेखोरांना तेथे आणल्‍याचे समजताच नागरिकांनी परिसरात गर्दी केली होती. गेल्‍या आठवड्यात करंजे नाका परिसरात गॅरेज चालकावर टोळक्‍याने दहशत माजवत कोयत्‍याने हल्‍ला चढवला होता. भरदिवसा घडलेल्‍या या घटनेने परिसरात हादरुन गेला. हल्‍ल्‍यावेळी नागरिकांची गर्दी झाली आणि एका संशयिताला नागरिकांनीच पकडून त्‍याला बदडले. पोलिस वेळीच पोहचल्‍याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. कोयता गँगचा सातार्‍यात नंगानाच वाढल्‍याने नागरिकांनी कायदा हातात घेतल्‍याचे चित्र निर्माण झाले होते. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर पोलिसांनी तात्‍काळ संशयितांची शोध मोहिम राबवली. कोयता गँगला अटक केल्‍यानंतर त्‍यांना पोलिस कोठडी मिळाली. कोयता हल्‍ल्‍याच्या तपासाचा भाग म्‍हणून बुधवारी दुपारी शाहूपुर पोलिसांनी संशयित टोळक्‍याने करंजे नाक्‍यावर आणले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp