
प्रतिनिधी | सोलापूर नवीन कुंभारी नाकाजवळील राधा दामोदर (इस्कॉन) मंदिरात सकाळी सहापासून भाविकांची गर्दी होती. फुलांची सजावट, प्रसन्न रांगोळी भावत होती. राधा-दामोदर मूर्तीला फुलांची आरास, जांभाळ्या रंगातील आकर्षक पोशाख होता. देवाचे तेज मनाला आनंद व चैतन्य देत होते. वृंदावन (मथुरा) येथून हा पोशाख खास गौर पौर्णिमा उत्सवासाठी आला होता. पोशाखाची किंमत किमान एक लाख रुपये आहे. दूध, दही, मध, साखर, विविध फळांचा रस असे एकूण १०० लिटर साहित्य वापरून अभिषेक झाला. सकाळपासून भजन. दहा ते साडेबारा यावेळेत पूज्य कृष्णभक्तदास यांचे गौर पौर्णिमा यावर आध्यात्मिक प्रवचन झाले. आरती नंतर एक हजार भक्तांसाठी महाप्रसाद झाला. पुरी, मिक्स पनीर भाजी, जामून, मसाला भात, वरण, बटाटावडा, मठ्ठा महाप्रसाद होता. कुठेही जायची गरज नाही, संसारात राहून नामस्मरण करा देवाचे नाव घेण्यासाठी कुठे जाऊ नका. उद्योग , व्यवसाय करत आपण देवाचे नामस्मरण करावे. कलियुगात देवाचे भजन अर्थात नामस्मरणाने देवप्राप्ती होईल. वृंदावन येथून वर्षातून १२ पोशाख उत्सव काळात येतात. आजचा देवाचा पोशाख एक लाख किंमतीचा आहे. पूज्य कृष्णभक्तदास, अध्यक्ष, इस्कॉन मंदिर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



