digital products downloads

ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा आजपासून सुरू: महंत पुजदेकर बाबांचे निरूपण, 13 मार्चपर्यंत चालणार – Amravati News

ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा आजपासून सुरू:  महंत पुजदेकर बाबांचे निरूपण, 13 मार्चपर्यंत चालणार – Amravati News



अमरावती येथील माताखिडकी स्थित द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण महिला मंडळाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा प्रवचन सोहळा आज, शुक्रवार, ६ मार्चपासून सुरू होत असून, आगामी १३ मार्चपर्यंत चालणार आहे. दररोज सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत प्रवचन होईल. या प्रवचनाचे निरूपण घोटी (जि. नाशिक) येथील ब्रह्मविद्या विभूषित, वयोवृद्ध आणि तपोवृद्ध परमपूज्य महंत पुजदेकर बाबा महानुभाव यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. पुजदेकर बाबा हे ब्रह्मविद्या शास्त्राचे गाढे अभ्यासक असून, त्यांची संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी प्रवचने होत असतात. या सोहळ्याचे उद्घाटन आज, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष तथा महानुभाव आश्रम, राजापेठ, अमरावतीचे संचालक कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर परमपूज्य महंत मोहनराज बाबा कारंजेकर यांच्या हस्ते होईल. यावेळी श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पावडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक राऊत, सचिव ॲड. अरुण ठाकरे आणि कोषाध्यक्ष इंजिनीअर एस. पी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रवचन सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम शुक्रवार, १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य आचार्यप्रवर दर्यापूरकर बाबा, बडनेरा आश्रम, तसेच रिद्धपूर निवासी महंत गोपीराज बाबाशास्त्री नवे महानुभाव हे असतील. या ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व सद्भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती श्रीकृष्ण महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp