digital products downloads

‘साक्षात’मध्ये कवी अजय कांडर: मराठवाडा साहित्य परिषदेच्या उपक्रमात उद्या सायंकाळी रसिकांशी साधणार संवाद – Chhatrapati Sambhajinagar News

‘साक्षात’मध्ये कवी अजय कांडर:  मराठवाडा साहित्य परिषदेच्या उपक्रमात उद्या सायंकाळी रसिकांशी साधणार संवाद – Chhatrapati Sambhajinagar News



मराठवाडा साहित्य परिषदेच्या साक्षात उपक्रमामध्ये शनिवार, 7 मार्च रोजी कणकवलीचे कवी अजय कांडर यांना आमंत्रित केले आहे, अशी माहिती मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता अजय कांडर यांचे भाषण होईल. ते आपल्या लेखनप्रवासाविषयी, वाड्मयी भूमिकेबद्दल व समकाली लेखक-कवींच्या लेखनासंबंधी विचार मांडतील. कांडर यांच्या भाषणानंतर रसिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देतील. कार्यक्रमाच्या अखेर ते काही कविता सादर करतील. अजय कांडर यांचे आवानओल, हत्ती इलो, युगानयुगे तूच हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. शेतीनिष्ठ लोकसमूहासमोरचे प्रश्न, कष्टकरी स्त्रियांचे जीवन, ग्रामीण समाजावर वाढलेला राजकारणाचा प्रभाव, सामाजिक प्रश्न मोठ्या आस्थेने त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. त्यांचा महाराष्ट्र फाउंडेशनचा काव्यपुरस्कार, विशाखा काव्यपुरस्कारासह अनेक मान सन्मान मिळालेत. साक्षात उपक्रमाला रसिकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन मसापचे कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह गणेश मोहिते, दीपा क्षीरसागर, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष हंसराज जाधव यांनी केले आहे. संबंधित वृत्त संडे पोएम:कवी अजय कांडर यांची रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा करणारी ‘आवानओल’ संग्रहातली कविता, ‘बाया पाण्याशीच बोलतात’

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp