
नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर येथे शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. तब्बल दीड ते दोन तास वाहन चालक एकाच ठिकाणी अडकून पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सध्या या मार्गावर एकेरी रस्तावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूक कोंडीची झाली. सध्या उन्हाचा पारा खूप वाढला आहे. जवळपास ३३ अंश सेल्सिअस तापमानमध्ये वाहनचालक ३ तास कोंडीमध्ये अडकून पडले होते. विंचूर बस स्टॅन्ड ते अपर्णा प्राईड मंगल कार्यालयापर्यंत तीन ते चार तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळाले. सुमारे दोन किलोमीटरहून अधिक लांब वाहतूक ठप्प झाल्याने वाहन चालवताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. लग्नसराईचा हंगाम असल्याने वऱ्हाडी मंडळी व खासगी वाहनांचीही मोठी गर्दी झाली होती. विंचूर येथे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असल्याने कांदा आणि धान्याच्या वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच अनेक वाहन चालकांनी आडवी तिडवी वाहने एकेरी रस्त्यावर टाकल्यामुळे अनेक तास वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. नाशिककडे तसेच येवला आणि लासलगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



