digital products downloads

महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार: 9 मार्चला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा, जिल्हा प्रभारी साहेबराव कांबळे यांची माहिती – Hingoli News

महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार:  9 मार्चला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा, जिल्हा प्रभारी साहेबराव कांबळे यांची माहिती – Hingoli News



केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस कडून तारीख 9 मार्च रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रभारी साहेबराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेस कांबळे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कांबळे यांनी सांगितले की, केंद्रातील भाजपा सरकारबरोबरच राज्यातील भाजपा महायुतीचे सरकारही शेतकरी विरोधी असून गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणून शेत जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाला तीव्र विरोध आहे पण सरकार मात्र या विरोधाकडे कानाडोळा करून त्यांच्या लाडक्या उद्योगपती मित्रासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहे. भाजपा सरकारच्या या जुलमी, अत्याचारी, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून ९ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढण्यात येणार आहे. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार, मनरेगा, शक्तीपीठ महामार्ग या प्रमुख मागण्याबरोबरच आदिवासी विशेष पदभरती, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, घरकुल योजना या मागण्यासाठीही हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे या यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी असून प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी साहेबराव कांबळे यांनी दिली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp