digital products downloads

सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला: दीड वर्षाच्या चिमुरड्यासह 8 जण जखमी, वीकेंडच्या सुट्टीचा आनंद विरला – Pune News

सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला:  दीड वर्षाच्या चिमुरड्यासह 8 जण जखमी, वीकेंडच्या सुट्टीचा आनंद विरला – Pune News



पुणेकरांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंहगडावर आज पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या नागरिकांवर मधमाशांनी भीषण हल्ला चढवला. शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे गडावर पर्यटकांची मोठी मांदियाळी असतानाच ही घटना घडल्याने परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात एका दीड वर्षाच्या बालकासह साताऱ्याचे एक ६४ वर्षीय आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी सिंहगडावर पर्यटकांची आणि दुर्गप्रेमींची मोठी गर्दी होती. दुपारच्या सुमारास अचानक ‘आगी मोहोळा’च्या मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. मधमाशा अंगावर येत असल्याचे पाहून पर्यटकांची मोठी पळापळ झाली. या हल्ल्यात सुमारे ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले, तर काही जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. दीड वर्षाच्या बालकासह एकाच कुटुंबातील ५ जण जखमी या दुर्दैवी घटनेत युवाश ऋषिकेश सोनार या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुरड्याला मधमाशांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतला. त्याच्यासोबतच त्याचे वडील ऋषिकेश नरेंद्र सोनार, निधी सोनार, कविता सोनार आणि अंश सोनार या एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना मधमाशांनी लक्ष्य केले. याशिवाय, साताऱ्याहून आलेले ६४ वर्षीय नंदकुमार शिदू घारघे यांनाही मधमाशांनी गंभीररीत्या जखमी केले आहे. स्थानिक आणि पर्यटकांकडून मदतकार्य घटनेची माहिती मिळताच गडावरील स्थानिक व्यावसायिक आणि इतर पर्यटकांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. ज्यांना मधमाशा चावल्या होत्या, त्यांना सुरक्षितपण गडावरून खाली आणण्यात आले. रुग्णवाहिकेची वाट न पाहता अनेक जखमींना खासगी वाहनांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन पथकही घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू केले आहे. पर्यटकांना खबरदारीचे आवाहन गडावर सध्या मधमाश्यांचे मोहोळ सक्रिय असल्याने पर्यटकांनी काही काळ सुरक्षित ठिकाणी राहावे किंवा गडाच्या काही विशिष्ट भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. डोंगराळ भागात फिरताना गडद रंगाचे कपडे किंवा तीव्र वासाची अत्तरे वापरल्याने मधमाश्या चिडू शकतात, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. हे ही वाचा… डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग:पाणी मागण्याच्या बहाण्याने केली होती छेडछाड, पुणे पोलिसांनी केली अटक ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर गावठाण परिसरात ही घटना घडली असून, आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने तरुणीची छेड काढली होती. श्रीधर हरीभाऊ कांबळे (वय २७, रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp