digital products downloads

इराण-इस्रायल युद्धाचा चटका मुंबईच्या किचनला!: गॅस टंचाईमुळे 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या उंबरठ्यावर – Mumbai News

इराण-इस्रायल युद्धाचा चटका मुंबईच्या किचनला!:  गॅस टंचाईमुळे 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या उंबरठ्यावर – Mumbai News



आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईतील हॉटेल उद्योगावर जाणवू लागला असून, गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे शहरातील सुमारे 20 टक्के हॉटेल्स आधीच बंद झाली आहेत. ‘आहार’ या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हा इंधन तुटवडा असाच कायम राहिल्यास आगामी तीन दिवसांत मुंबईतील 50 टक्के हॉटेल्स कुलूपबंद होण्याची भीती वर्तवण्यात येत असून, जागतिक संघर्षाच्या या झळांमुळे हॉटेल व्यवसायासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. गॅसचा तुटवडा पुढील काही दिवस कायम राहिल्यास मुंबईतील परिस्थिती अत्यंत चिंताजनक होऊ शकते, असा इशारा आहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. जर आगामी तीन दिवसांत गॅस पुरवठा पूर्ववत झाला नाही, तर मुंबईतील सुमारे 50 टक्के हॉटेल्स बंद करण्याची नामुष्की ओढवू शकते. या इंधन संकटामुळे आधीच डबघाईला आलेल्या हॉटेल व्यवसायासमोर आता अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गॅस तुटवड्याच्या या गंभीर संकटावर तोडगा काढण्यासाठी आहार संघटना आता केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरांवर सक्रिय झाली असून, याप्रकरणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी सातत्याने संवाद साधला जात आहे. तसेच या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन संघटनेचे प्रतिनिधी मंगळवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असून, या बैठकीत विस्कळीत झालेला गॅस पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याबाबत आग्रही मागणी केली जाणार आहे. दरम्यान गॅस तुटवड्याचे हे संकट केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून त्याचा फटका आता देशातील इतर महत्त्वाच्या शहरांनाही बसू लागला आहे. बंगळुरू हॉटेल असोसिएशननेही अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे मंगळवारपासून काही हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या समस्येची व्याप्ती स्पष्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेला हा इंधन तुटवडा जर तातडीने सुरळीत झाला नाही, तर संपूर्ण देशातील हॉटेल उद्योगाला एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp