digital products downloads

व्ही. के. सिंग अंडरवर्ल्डशी जोडलेले असू शकतात: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर अमोल मिटकरींचा गंभीर आरोप – Mumbai News

व्ही. के. सिंग अंडरवर्ल्डशी जोडलेले असू शकतात:  अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर अमोल मिटकरींचा गंभीर आरोप – Mumbai News



राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप केला. व्ही. के. सिंग यांनी पिंकी माळी यांच्या भावाला माध्यमांसमोर येऊ नका, अशी धमकी दिली आहे. त्यांनी वापरलेली भाषा अंडरवर्ल्डशी संबंधित लोक वापरतात, अशी शंका वाटते. त्यामुळे व्ही. के. सिंग यांचे अंडरवर्ल्डशी काही संबंध आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे, असे मिटकरी म्हणाले. मिटकरी यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीत व्हीएसआर कंपनीने या कुटुंबाला कोणतीही मदत केलेली नसल्याचे समोर आले. या कुटुंबाला कोणताही आधार देण्यात आलेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. त्याचवेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. पिंकी माळी यांच्या आईच्या उपचारासाठी दोन डॉक्टरांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी शिंदेंचे कौतुक केले. तसेच या संपूर्ण कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि उपचारांचा सर्व खर्च सरकारने उचलावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, अजित पवार विमान दुर्घटनेच्या तपासाबाबतही मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेवर चर्चा सातत्याने पुढे ढकलली जात असल्याचे त्यांनी म्हटले. आज या विषयावर चर्चा होईल असे सांगितले होते, मात्र तो अजेंड्यातच नाही. त्यामुळे या प्रकरणात विलंब का केला जात आहे, असा प्रश्न निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेबाबत अद्याप पोलिसांकडून एफआयआरही नोंदवण्यात आलेली नाही, हेही त्यांनी अधोरेखित केले. अजित पवारांच्या विमान अपघातावर सभागृहात चर्चा मिटकरी यांनी पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणावर विरोधक नक्कीच आवाज उठवतील. अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा गंभीर आहे आणि यावर सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. विरोधक हा विषय सभागृहात उपस्थित करतील आणि मी स्वतःही या चर्चेत सहभागी होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून तपासाची दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp