digital products downloads

गॅसची टंचाई तात्काळ सोडवा अन्यथा विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू: रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा; आखाती देशातील युद्धाचा राज्यावरही परिणाम – Pune News

गॅसची टंचाई तात्काळ सोडवा अन्यथा विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू:  रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा; आखाती देशातील युद्धाचा राज्यावरही परिणाम – Pune News



इराण, अमेरिका आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक देशांमध्ये आता तेलाची तसेच सीएनजी गॅसची टंचाई उद्भवली आहे. भारतातही याची झळ पोहोचण्यास सुरू झाली असल्याचे दिसत आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यात गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिला आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, मुंबई-पुणे आणि परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात होईल. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, हसे तर केंद्राशी बोलून यावर तोडगा काढावा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा खडसे यांनी दिला आहे. हॉटेल्स-खानावळी बंद होण्याच्या मार्गावर पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेलाही बसू लागली आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावी हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहेत, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. दरम्यान, अमेरिका, इस्राइल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे येथून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायुचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये सीएनजी गॅसची, घरगुती गॅस, नैसर्गिक वायु आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. तसेच हे युद्ध असेच सुरू राहिले तर याहीपेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील हॉटेल्समध्ये मेन्यू कार्ड बदलण्याची वेळ गॅस तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल्समध्ये मेन्यू कार्ड बदलण्याची वेळी आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जे पदार्थ एकाचवेळी शिजवून तयार करता येतात असे पदार्थ ग्राहकांना देता येणे शक्य आहे. मात्र ऐनवेळी तयार करावे लागणारे पदार्थ देणे बंद केल्याचे हॉटेल्स व्यावसायिकांनी सांगितले आहे. पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ग्राहकांना इडली किंवा वडा मिळू शकतो पण डोसा मिळणार नाही. हे पदार्थ देखील पुढचे दोन दिवसच मिळू शकतील. गॅस पुरवठा पूर्ववत न झाल्यास पुण्यातील हॉटेल्स दोन ते तीन दिवसांत बंद पडतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp