
.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र असे भेद आपण करतो. मात्र ही पृथ्वीच आपले घर आहे. देवानेच प्रत्येक मानवाला चारही वर्णाचे बनवले आहे. प्रत्येक मनुष्य चारही वर्णाचा आहे. घरात तो कोणाला शिकवण देतो तर ब्राह्मण, धर्म व परिवारासाठी लढतो तर क्षत्रिय अर्थात सर्वच वर्णाचे कर्म प्रत्येक माणूस करतो. यामुळे राजकीय स्वार्थ व मतांसाठी जाती-पातींमध्ये विभागले जावू नका. एकत्र रहा, भगवान शंकराची भक्ती करा असा सल्ला पं. प्रदीप मिश्रा यांनी दिला. पाडळसे (ता.यावल) येथील अकलूद शिवारात सुरु असलेल्या श्री शिवमहापुराण कथेत बुधवारी दुसऱ्या दिवशी निरुपण करताना ते बोलत होते. यावेळी मिश्रा म्हणाले की, भगवान शंकराला एकदा शरण जा. ज्या दिवशी भोलेबाबाची शरणागती ग्रहण करतात, भगवान शंकराला आपला पिता मानतात तेव्हा तेच आपली काळजी घेतात. इतक्या उच्चांकी तापमानात लाखो भाविक आले, तुम्ही येथे सिहोरवाले बाबांसाठी नाही तर देवाधिदेव महादेवासाठी आला आहात. त्याच प्रकारे आपले दुख: हरण करण्यासाठी भगवान भोलेनाथ तुमच्या दारापर्यंत येतील. त्यामुळे एकत्र राहून महादेवाची भक्ती करा. श्री गजानन महाराजांच्या चरणी सर्वांत मोठा भंडारा : जगातील सर्वांत मोठे महाप्रसाद वितरण शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या दरबारात होते. जितके भक्त येतील, त्या सर्वांना एकसारखा महाप्रसाद दिला जातो. यामुळे धर्माच्या ठिकाणी, महाप्रसादाच्या ठिकाणी भेदभाव करु नये. समदृष्टी, समविचार, समभाव ठेवूनच प्रसाद वितरण केला जावा. असे पं.मिश्रा यांनी सांगितले. उन्हातही उत्साह कायम | शिवपुराण कथेला भाविकांची मोठी गर्दी होत आहे. कमाल तापमान चाळिशीपार असले तरी भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. अनेक जण उन्हापासून बचावासाठी छत्र्यांचा वापर करत आहे. छत्र्यांच्या सावलीत बसून कथाश्रवण करत आहेत. अनेकवेळा आपण काय उपवास, व्रत, आराधना करतो ते देखील अभिमानाने सांगतो. पण, अभिमान शंकराला आवडत नाही. तुम्हाला अभिमान झाला म्हणजे भगवान शंकर तुमच्यापासून दूर होतील. यामुळे कोणत्याही गोष्टीचा अभिमान करु नका. आपण केवळ आपले कार्य करत राहावे. जे काही आपल्या हातून होते ते केवळ शिवकृपेमुळे होते. आपण निमित्त आहोत, असे आवाहन केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



