digital products downloads

सिमेंट पाईपमध्ये अडकून बुडाल्याने तीन कामगारांचा मृत्यू: सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना, मृत तरुण ओडिसातील रहिवासी – Kolhapur News

सिमेंट पाईपमध्ये अडकून बुडाल्याने तीन कामगारांचा मृत्यू:  सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना, मृत तरुण ओडिसातील रहिवासी – Kolhapur News



सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव हद्दीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कॅनॉलचे पाणी वाहून नेणाऱ्या सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने ओडिसातील तीन कामगारांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील खानविलकर फार्मजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण हिंगणगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. हिंगणगाव ते आदर्की या रस्त्याखालून कॅनॉलचे पाणी पलीकडे नेण्यासाठी सिमेंटचे पाईप (पोटपाट) टाकण्यात आले आहेत. ‘प्रिमियम चिक फिड प्रा. लि.’ या कंपनीत काम करणारे तीन कामगार या पाईपमध्ये साचलेल्या पाण्यात काही कारणास्तव अडकले. पाण्याचा प्रवाह आणि पाईपमधील अरुंद जागेमुळे त्यांना बाहेर पडता आले नाही आणि गुदमरून व पाण्यात बुडून या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृत कामगार ओडिसातील रहिवासी हे तिन्ही कामगार ओडिसा राज्यातील असून, ते प्रिमियम चिकफिड कंपनीत कामाला होते. ते हिंगणगाव येथील सुळवस्ती भागात राहत होते. ज्योर्तिमय भगिरथी नाईक (वय २२ वर्षे, रा. गिधीबास, बरिया, ओडिसा), सतिन बिरची नाईक (वय ३५ वर्षे, रा. उखेपाल, मयुरभंज, ओडिसा), श्रीराम जगाई हेबरंम (वय २० वर्षे, रा. चिकाडी, मयुरभंज ओडिसा) अशी मृतांची नावे आहे. पोलिस तपास सुरू या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी शाम बाळू भगत यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहित हेगडे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. हे कामगार पाईपमध्ये नेमके कशामुळे शिरले होते, याचा शोध पोलिस घेत आहेत. हे ही वाचा… सातारा जिल्ह्यावर शोककळा:पाटणचे सुपुत्र बाळकृष्ण निकम सिक्कीममध्ये शहीद; सेवानिवृत्तीला दीड वर्ष उरले असतानाच काळाचा घाला सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरविणारी घटना समोर आली आहे. सिक्कीममध्ये पहाडी प्रदेशात तैनात असलेला पाटण तालुक्यातील जवान शहीद झाला आहे. बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४१), असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. ते पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र होते. सेवानिवृत्तीला अवघे दीड वर्ष बाकी असताना त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराला जबर धक्का बसला आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp